मॅक करिता मायक्रोसॉफ्ट आऊटलूक एक्सप्रेस
मायक्रोसॉफ्टची एक नवीन, गतिमान, उत्तम आवृत्ती सादर होत आहे. मॅकीन्टोश कॉंप्यूटर्सकरिता ती आहे. लोकप्रिय असलेले ईमेल, कॅलेंडर व कॉटॅंक्टस प्रोग्राम हे मॅक वर सादर होत आहेत अशा आवृत्तीत जी दिसण्यात व कार्यपध्दतीत बहुतांश प्रमाणात विंडोज आवृत्तींसमान आहे. मॅक साठी एका बलवान, विशिष्टतांनी युक्त आऊटलूकचे आगमन हे मॅक 2011 साठी केवळ ऑफिसमध्ये नावीन्यपूर्ण नसून, ती आहे एक मोठी उपलब्धी, विशेषतः मॅक उपभोक्त्यांसाठी, किंवा मॅकचा अवलंब करण्याची ज्यांची मनीषा आहे, तसेच आऊटलूक जेथे मानक आहे अशा कंपनींत काम करणार्यांसाठी.
नवीन ऑफिस 2011 विंडोज आवृत्ती प्रमाणेच फाईल फॉर्मट्स वापरते. कसलेही रुपांतरण वा अनुवाद न करता ते ऑफिस फाईल्स रीड व राईट करु शकते, यामुळे मॅकसाठी उत्पादित वर्डमधील एक डॉक्युमेंट, विंडो उपभोक्ताही हे जाणत असूनही की ते मॅक वर बनलेले आहे, कुठल्याही अडचणीशिवाय रीड करु शकतो - तसेच याच्या अगदी उलटही.
मॅक उपभोक्ते नवीन 2011 आवृत्तीबाबत पहिली गोष्ट अनुभवतील ती असेल त्याचा वेग. 2008 आवृत्ती पूर्वीच्यांपेक्षा वेगवान असताना, ही नवीनतम आवृत्ती नाटकीय स्वरुपाने वेगवान आहे. मोठी जमेची बाजू आहे याची विंडोज डॉक्युमेंटसोबतची निष्ठता. विंडोज व मॅक ऑपरेटिंग सिस्टम्स वेगवेगळ्या असल्याने, निष्ठता परिपूर्ण नव्हती, पण ती या नवीन आवृत्तीत उत्तम होती. एक्सेलमध्ये हे विशेषतः ध्यान आकर्षते, जेथे किचकट स्प्रेडशीट्सवर चार्टस व लेआऊट्स कधी कधी योग्यपणे कार्यशीलता दाखवत नाही.
नवीनतम मॅक आवृत्तीने विंडोजमध्ये उपलब्ध असलेल्या सिस्टमच्या सारखीच मॅक्रो सिस्टम आत्मसात केली आहे, म्हणूनच विंडोज डॉक्युमेंटमध्ये पॉवर उपभोक्ता व कंपनी यांनी निर्मिलेल्या स्वयंचलित संक्रिया आता या मॅक आवृत्तीत वापरल्या जाऊ शकतात.
आऊटलूक मॅकमध्ये मायक्रोसॉफ्ट (एमएसएफटी) ईमेल, कॉंटॅक्टस व कॅलेंडर प्रोग्रामचे एन्टूरेज म्हटल्या जाणार्या प्रोग्रामने प्रतिस्थापन करते, ज्याने स्वतः मॅक करिता काही वर्षांपूर्वी उत्पादित आऊटलूकच्या एका जुनाट, अगदीच मर्यादित आवृत्तीची जागा घेतली होती. कित्येक उपभोक्त्यांनी एन्टूरेज अवघड व किचकट असल्याचे अनुभवले, व ते विंडोजवरुन आऊटलूकवर थेट डेटा आयात करु शकले नाही. मायक्रोसॉफ्टने नवीन आऊटलूक विंडोजवर असलेल्या प्रमाणेच दिसावे व कार्य करावे यासाठी कडी मेहनत घेतलेली आहे.
परंतु मायक्रोसॉफ्ट अजुनही अॅपलच्या आयकॅल कॅलेंडर प्रोग्रामसोबत जुळवणीवर काम करत आहे, व आऊटलूक कॅलेंडर गुगल कॅलेंडरसोबत जुळू शकत नाही. आणि, नवीन मॅक आऊटलूक विंडोज आऊटलूक डेटा आयात करु शकत असताना, विंडोजवर आपला डेटा मात्र अजुन पर्यंत निर्यात करु शकत नाही. यावरही काम करत असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. मॅकवरील आऊटलूक वेगवान व सक्षम शाबित झाले. ते अगदीच विंडोजवरील आऊटलूकच्या अगदीच साम्यतेने काम करीत नाही, पण विंडोज उपभोक्ते यात समानतेचाच अनुभव करतील. तसेच यात मॅक-विशिष्ट गुणधर्मही समाविष्ट आहेत.