Skip Ribbon Commands
Skip to main content

विंडोज लाईव

विंडोज लाईव हे मायक्रोसॉफ़्टच्या सेवा आणि सॉफ़्टवेयर उत्पादने यांच्या संचाचे एकत्रित मानचिन्हाचे नाव आहे. यापैकी अधिकतम सेवा संकेत आवेदने आहेत. विंडोज लाईवच्या अंतर्गत समुहित आवेदने अशा प्रकारे आहेत.
लेखक (रायटर)
विंडोज लाईव लेखकासोबत, परिच्छेदलेखन हे फ़ारच सोपे बनते. तुम्ही छायाचित्रे व चलचित्रेप्रकारच्या दस्तावेजांना जोडून अधिकतम परिच्छेदलेखन सेवांतून प्रसिध्द करु शकता. लेखक, जवळ्पास कुठल्याही परिच्छेदलेखन सेवेतून प्रसिध्दी देण्याची सेवा देतो ज्यात विंडोज लाईव, वर्डप्रेस, ब्लॉगर, लाईव जर्नल, टाईप पॅड, शेअर पॉईंट, कम्युनिटी सर्वर आणि कित्येक आधिक सेवा संमिलीत आहेत. आपल्या परिच्छेदाला जोडत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही परिच्छेदलेखनात प्रसिध्दीअगोदरच पूर्वावलोकन करु शकता, जसे की अक्षरप्रकार, रिक्त जागा, रंग व चित्रे. एमएसएन वीडियो, वा युट्युबमध्ये सोपबॉक्स द्वारे चलचित्रे प्रसिध्द करण्यात व त्यांना तुमच्या परिच्छेदलेखाशी जोडण्यात लेखक मदत करतो. लेखक अगोदरच उपयुक्त गुण्धर्मांनी युक्त आहे, तुम्ही अधिक जोडणी करु शकता व अजुनही खुप काही करु शकता.
त्वरित संदेशवाहक (इन्स्टंट मेसेंजर)
 संदेशवाहकाद्वारे संपर्कात रहाण्यास विंडोज लाईव मदत करते ज्याच्याकरवी तुम्ही गप्पागोष्टी करू शकता, चित्रांचे वहन, खेळ खेळ्णे व छायाचित्रांची देवघेवही करु शकता. स्वतःचे लहान चलचित्र वा छायाचित्र जोडून आपली मनःस्थिती बदलू शकता, तुंम्ही कुठले संगीत ऐकताय हे लोकांना सांगू शकता, व संवाद झरोख्यात देखाव्यांना दृष्य करु शकतो. चित्रांना तुम्ही ओढून सरळ संवाद झरोख्यात घालू शकता व गप्पागोष्टी करतानाच ती दाखवूही शकता. तुम्ही संपर्कांना त्यांच्या संगणकावर तुमची चित्रे साठवू देवू शकता. तुमच्याशी गप्पागोष्टी करत असलेल्या कुणालाही जर त्यांचा संगणक सोडावा लागला, तरीही तुम्ही संदेशवाहकाचा वापर करुन त्यांच्या भ्रमण्ध्वनीवर एसएमएस लेखी संदेश पाठवू शकता.
विद्युत डाक (ईमेल)
मेल, बहुउद्देशीय दिनदर्शिकेसोबत तुमचे हॉटमेल, जीमेल व अन्य खाती एकत्र आणते. मेल, आउटलूक च्या सरळसोप्या वापराची विंडोज लाईवच्या वेगाशी सांगड घालते. आपण जोडणीत नसतानाही, जुने निरोप, दिनदिनदर्शिका गतिविधींचा सुगम मेलद्वारे प्राप्त करू शकता. आपण प्रत्युत्तर बनवून त्यास जुळ्वून पुढल्या पुनःजोडणीच्या वेळी धाडू शकता.विंडोज लाईव मेल अनेक पटीतील आपल्या ईमेल खात्यांत अधिकतम सुरक्षा देण्यात मदत करते. स्पॅम गाळण उपद्रवी निरोपांना दूरच ठेवते व शंका असलेल्या मेलबद्दलही सांगते. एकाच क्लिकद्वारे तुम्ही निरोप गाळूही शकता व धाडणा–याला निर्बंधितही करू शकता. विंडोज लाईव मेलमधील तुमची दिनदिनदर्शिका ठरवलेल्या सर्व महत्वाच्या नेमणुकींबद्दल काळजी घेण्यास मदत करते. तुम्ही मर्जीने रचनेनुसार ईमेलद्वारे किंवा तुमच्या भ्रमण्ध्वनीवर किंवा संदेशवाहकावर स्मरणसूचनाही पाठवते.
छायाचित्र दालन
 तुमची छायाचित्रे व चलचित्रे तुमच्या कॅमेरातून संगणकात प्राप्त करण्यास एकच क्षण लागेल. तुंही तुमचे आवडती छायाचित्रे शोधून त्यांना आपल्या कुटुंबियांशी व मित्रमंडळींशी भागू शकता. तुम्ही तुमची छायाचित्रे अधिक सुंदर दाखवू शकता व प्रभावी छायाचित्रे घडवूही शकता. छायाचित्रांना तुम्ही जोडणीतील अंकात घालू शकता, त्यांना ईमेलद्वारे पाठवू शकता किंवा त्यांना छापूही शकता. त्यांना जोडणीत असताना कोण पाहू शकतात यावरही आपले नियंत्रण असू शकते. छायाचित्र दालन स्वयंचलितपणे तुमच्या छायाचित्रांतील लोकांना शोधते ज्यामुळे त्यांच्या चेहे–यांना नावे देता येतील. त्यानंतर, ज्या माणसाची सर्व छायाचित्रे पहायची असतील त्याचे फ़क्त नावाचे नाव टंकन करायची गरज आहे. छायाचित्र दालन, तुमच्या विंडोज लाईववर काही नवी चित्रे जर त्यांनी आपल्याशी भागलेली असल्यास दाखवते. छायाचित्र दालन वापरुन प्रदर्शानाची, रंगांची, तपशीलांची जुळ्वण करू शकता वा तुमची छायाचित्रे उत्तम दिसण्यासाठी स्वयंचलित जुळ्णीचा अवलंब करु शकता. अचंबित करणा–या देखाव्यांची तुम्ही निर्मिती करु शकता.छायाचित्र दालन एका क्लिकद्वारे काही छायाचित्रांना एकत्र शिवूही शकतो.
चलचित्र निर्माता
 चलचित्र निर्मात्यासोबत तुमच्याच छायाचित्रांतून व चलचित्रांतून सिनेमा व स्लाईड खेळ घडवून त्यांना भागू शकता. तुमच्याच छायाचित्रांना, चलचित्रांना व गाण्यांना स्वयंचलितपणे एका उत्तम सिनेमात बदला. स्वयंचलित सिनेमा एक मथळा जोडते, देवघेव व परिणाम घालते व चलचित्रांसाठी सर्वांना एकत्र जोडते. वापरास सोप्या अशा संपादन अवजारांमुळे तुम्ही तुमचे चलचित्र आरामात संपादित करु शकता. तुमच्या चलचित्रांना काटछाट करुन मर्जीचेच भागच दाखवू शकता. चलचितत्रांना ध्वनी व परिणाम जोडू शकता जसे चित्र उभे-आडवे दाखवणे व भिंगद्रुष्यता. तुमचीच छायाचित्रे, संगीत व चलचित्र निर्मात्यातील संपादन अवजारे वापरुन उत्तम स्लाईड खेळ घडवा. जसे सगीत वाजेल, आपल्या छायाचित्रांना समोरुन सरकताना पहा व आपल्या चलचित्रातील आपल्या ता–यांना भिंगप्रक्रियेने जवळुन पहा. तुमचे चलचित्र युट्युबवर चलचित्र निर्मात्याद्वारे सरळ प्रसिध्द करु शकता किंवा तुमच्या चलचित्रास डीवीडी प्रकाराचासुध्दा अंतर्भाव असलेल्या अनेक नमुन्यांत भागूही शकता.
उपकरण पट्ट (टूलबार)
विंडोज लाईव उपकरण पटाने, संकेतस्थळांवर कुठेही असताना विंडोज लाईवशी चटकन सुगमता मिळ्ते. विंडोज लाईवमधील तुमच्या संपर्कातील लोक काय म्हणत आहेत, ते कुठली छायाचित्रे प्रसिध्द करत आहेत, व काय जोडण्या ते भागत आहेत, हे सरळ तुम्ही तुमच्या उपकरण पटावर पाहू शकता. तुमच्या शोधाचे तुम्ही लगेच पटावर शुध्दीकरण करु शकता व सकेतावर संबंधित गोष्टी अनुभवू शकता. अगोदर केलेल्या शोधांना पुन्हा पुन्हा करु शकता व लोकप्रिय शोधांनासुध्दा पाहू शकता. विंडोज लाईववर, एका क्लिकद्वारे, तुमच्या आवडत्या संकेतस्थळांना तुमच्या संपर्कातील लोकांशी भागू शकता. तुमच्या इंटरनेट एक्स्प्लोररवरील आवडत्या गोष्टींना एकापेक्षा जास्त संगणकांवर सुरक्षित ठेवू शकता, व कुठल्याही संगणकावरुन ज्यात तुम्ही विंडोज लाईव उपकरण पट्ट सुरक्षित ठेवलेला आहे, त्यांत प्रवेश करुन वापर करु शकता. सद्य संकेतपान न सोडता, उपकरण पटाद्वारे तुम्ही तुमच्या विंडोज लाईव हॉटमेलची डाकपेटीचे पूर्वावलोकन करु शकता.उपकरण पटावरील उप्लब्ध पर्यायी कळांना वापरा जी संकेतपानांचे भाषांतर करु शकते, सिनेमांची माहिती शोधू शकते, विकीपेडिया शोधू शकते, ईबेवर डोळा ठेवू शकते व बरेच काही करु शकते.
सुरक्षा
परिवाराच्या वापराच्या सुरक्षेबरोबर, तुमच्या मुलांनी संकेतास कसे अनुभवावे हे तुम्हीच ठरवा. तुम्ही शोधकार्यांना मर्यादा घालू शकता, पाळत ठेवून संकेतस्थळांना अडवू वा परवानगी देवू शकता, व हेही ठरवू शकता की विंडोज लाईववरील स्थानांत, संदेशवाहकात, किंवा हॉटमेलमध्ये तुमच्या मुलांनी कुणाशी संपर्क ठेवावा. प्रत्येक मुलाच्या स्वतःच्या विंडोज खात्यांतर्गत संगणकात प्रवेश करण्याने हा फायदा होतो की त्यांना स्वतःच्या सेटिंग्ज मिळतात, व तुम्हाला प्रत्येक मुलाचे वेगवेगळे अहवाल व गाळणप्रक्रियेने निगडीत माहिती मिळते. सांकेतिक गाळण क्रियेच्या वापराने, त्यांनी पाहू नये असे तुम्हाला वाटणाऱ्या संकेतावरील काही गोष्टींपासून, त्यांच्यासाठीच्या वैयक्तिक सेटिंग्जमुळे बचाव करू शकता. क्रमवार गतिधी अहवाल, तुम्हाला प्रत्येक मुलाने कुठली संकेत स्थळे पाहिली, कुठले उपक्रम वापरले, व संगणकावर किती वेळ घालवला हे दाखवतो. अंतर्निर्मित संपर्क व्यवस्थापन आपल्याला हे ठरवण्याची मुभा देतो की विंडोज लाईव स्पेसमध्ये, संदेशवाहकात, व हॉटमेलमध्ये कुणाकुणाशी तुमच्या मुलांनी बोलावयाचे याची. केवळ लॉग ऑन करून कुटूंब सुरक्षा संकेतावर जाऊन प्रत्येक मुलाची सुरक्षा सेटिंग जुळवा, ज्यामुळे तुम्ही घरी नसतानाही याचे व्यवस्थापन सोपे होईल.
This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.