Skip Ribbon Commands
Skip to main content

विंडोज् मार्केटप्लेस


संचलन प्रणाली, उत्पादकता सुइट्स, एप्स इत्यादिंसारख्या मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेयर उत्पादनांसाठी विंडोज् मार्केटप्लेस  हे एकीकृत विक्रीचे ठिकाण आहे. विंडोज् लाइव्ह आयडी वापरून यात प्रवेश मिळवता येतो.


विंडोज् मार्केटप्लेसमध्ये एक डिजीटल लॉकर पुरवले जाते ज्या द्वारे तुम्ही अनेक व्यापारी आणि त्यांची उत्पादन सूची पाहू शकता. यात विकत घेतलेले सॉफ्टवेयर तुम्हाला डिजीटल लॉकर सहाय्यकाच्या मदतीने सुरक्षित रूपे डाउनलोड करता येते. ही सुविधा केवळ यू.एस. मधील ग्राहकांना उपलब्ध आहे.


२००८ मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज् मार्केटप्लेस बंद करण्याची घोषणा केली; त्या ऐवजी लोकांना त्यांच्या मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये जावे लागेल. २००९ प्रारंभी मोबाइलसाठी विंडोज् मार्केटप्लेस सुरु करण्यात आले, पुढे याला नवीनीकृत करून विंडोज् फोन ७ मार्केटप्लेस करण्यात आले.


विंडोज् मार्केटप्लेसला सध्या मायक्रोसॉफ्ट स्टोअरकडे पुनर्निर्देशित केले जाते. मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये विंडोज्, ऑफिस उत्पादकता सुइट, डिझाइन उपकरणे, विकास उपकरणे, पुस्तके, नेटबुक्स, लॅपटॉप्स, विंडोज् फोन्स, खेळ, सहायक उपकरणे आणि अनेक इतर प्रकारची सामग्री उपलब्ध आहे.


खरेदी प्रणालीचा वापर करणे सोपे आहे कारण मुख-पृष्ठावर सर्वात महत्त्वपूर्ण उत्पादने तात्काळ प्रदर्शित केली जातात. तुमच्या आवडीच्या सॉफ्टवेयर/हार्डवेयरची खरेदी त्या वस्तुच्या खरेपणाची खात्री ठेऊन तुम्ही केवळ काही क्लिक्स द्वारेच करू शकता. देशांच्या विशिष्ट परिवहन आणि उपस्कर आवश्यकतांप्रमाणे व्यवस्था केली जाऊन सामग्रीची त्वरित पोच सुयोग्य किमतीत होणे सुनिश्चित केले जाते. 


अधिक विवरणासाठी www.windowsmarketplace.com वर लॉगइन करा.

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.