Skip Ribbon Commands
Skip to main content

 

विंडोज 7

            जंप लिस्ट्स नावाचे एक नवीन वैशिष्ट्य सादर केले गेले आहे ज्याचा वापर तुमची आवडती चित्रे, गाणी, वेब साइट्स आणि दस्तऐवज यांच्या जलद उपलब्धतेसाठी केला जाऊ शकतो. विंडोज टास्कबार अधिक चांगला थंबनेल प्रिव्ह्यू आणि सुस्पष्ट चिन्हे दाखवतो आणि त्याला अनुरूप करण्याचे अधिक उपाय आहेत. अधिक जलद स्लीप आणि रिझ्यूम, मेमोरीची कमी आवश्यकता आणि यूएसबी उपकरणांचा अधिक जलद स्वीकार यांद्वारे याच्या कार्यप्रदर्शनात सुधारणा आणली गेली आहे.

            विंडोज 7 चे खास रूप हा एरो चा परिणाम आहे, एक उत्कृष्ट दृश्यानुभव ज्याने तुमच्या पीसीवर काम करणे अतिशय आनंददायक होते. विंडोजच्या कडा सूक्ष्म रंगछटायुक्त पारदर्शक काचेच्या असल्या सारख्या वाटतात ज्या एका विस्तृत रंगसंगतीसह उपलब्ध आहेत. विंडोच्या कडा, नवीन स्वरूपाचा स्टार्ट मेन्यु आणि टास्कबार हे विंडोज द्वारे एरोमधे अंतर्भूत केले गेले आहेत, ज्याने तुमच्या काँप्यूटरचे रूप आणि आवाज बदलणे केवळ काही सोप्या चरणांत केले जाऊ शकते.

            होम नेटवर्किंगची डोकेदुखी विंडोज 7 ने होमग्रुप द्वारे काढून टाकली आहे. याशिवाय विंडोजकरेक्ट नाऊ एक असे वैशिष्ट्य आहे ज्याने तुमचे होम नेटवर्क केवळ एक बटण दाबून स्थापित केले जाऊ शकते - फक्त एक वाय-फाय राउटर आणा ज्यावर विंडोज 7 शी अनुरूप असे स्टिकर असेल. तुमचे नेटवर्क स्थापित झाल्यावर नवीन व्ह्यू अव्हेलेबल नेटवर्क्स याला जोडणे सोपे करतो. हे टास्कबारवर स्थित असून यात तुमचे सर्व पर्याय - वाय-फाय, मोबाइल ब्रॉडबँड, डायल-अप किंवा कॉरपोरेट व्हीपीएन - प्रदर्शित होतात. फक्त दोन क्लिक्स, आणि काम झाले.

            विडोज 7 ची रचना तुमच्या लॅपटॉपची बॅटरी अधिक काळ टिकण्यासाठी देखील केली गेली आहे. उदाहरणार्थ, तुम्ही इथरनेट जॅक वापरत नसल्यास त्याला पॉवर मिळणे बंद होते आणि काँप्यूटर बराच काळ निष्क्रीय असल्यास एलसीडी स्क्रीनचा प्रकाश अंधुक होतो, ज्याने पॉवरची मोठी बचत होते.

            विंडोज 7 मधे लायब्ररी नावाचे एक नवीन वैशिष्ट्य आहे ज्यात तुम्ही फाइल्स संग्रहित करू शकता, त्या कुठेही असल्या तरी किंवा त्यांचे नाव काहीही असले तरी. लायब्ररीमधे 50 नवीन जागा समावू शकतात. तुम्ही नवीन लायब्ररी देखील तयार करू शकता - आणि त्यांना पाहिजे ते नाव देऊ शकता. उदाहरणार्थ, एखादा आर्किटेक्ट त्याच्या इमारतीच्या प्रोजेक्टसाठी ब्ल्यूप्रिंट्स, संपर्क आणि फोटो इत्यादिंची लायब्ररी तयार करू कतो.

            विंडोज ७ मधे फाइल्स, फोल्डर्स, प्रोग्रॅम्स आणि फोटो शोधणे अतिशय सोपे आहे. तुम्ही स्टार्ट मेन्यु वरील किंवा कुठल्याही खुल्या विंडोमधील सर्च बॉक्स वापरून काहीही शोधू शकता. तुम्हाला पाहिजे ते शोधण्यासाठी तुम्ही प्रथम स्टार्ट मेन्यु वरील सर्च बॉक्सच पाहता. तुम्ही स्टार्ट मेन्यु वरील सर्च बॉक्स वापरून काँप्यूटरवर स्थित फाइल्स, फोल्डर्स, प्रोग्रॅम्स आणि ई-मेल संदेश शोधू शकता. फक्त स्टार्ट बटण क्लिक करा आणि सर्च बॉक्समधे टाइप करा. तुम्ही टाइप करायला सुरुवात करताच त्याच्याशी जुळती नावे स्टार्ट मेन्युवर येऊ लागतील.

            विंडोज टच हा टचस्क्रीन तंत्रज्ञान वापरून तुमच्या काँप्यूटरशी अंतर्क्रिया करण्याचा स्वाभाविक मार्ग आहे. जेव्हां तुम्ही विंडोज 7 ला टचस्क्रीन पीसीशी जोडता, तेव्हां तुम्ही त्याला बोटांवर खेळवू शकता. मल्टीटच तंत्रज्ञान वापरून विंडोज 7 संभावनांचे एक नवे विश्व खुले करून देतो. एक डबल क्लिक आता डबल टॅप होते. इंटरनेट एक्सप्लोरर 8 मधे तुम्ही तुमचे बोट स्क्रीनवर खाली-वर करून वेबपेज स्क्रॉल करू शकता. फोटो व्ह्यूअरमधे दोन बोटे स्क्रीनवर पसरवून झूम इन करा, किंवा एक बोट दुसऱ्याभोवती फिरवून फोटोला फिरवा.

            विंडोज 7 साठी मायक्रोसॉफ्ट टच पॅक भविष्याची झलक दाखवतो. काही टच स्क्रीन पीसीसह येणाऱ्या या नवीन पॅकमधे एक 3-डी व्हर्चुअल पृथ्वी आहे जी तुम्ही हाताने फिरवू शकता. मायक्रोसॉफ्ट सरफेस ग्लोब वर कुठलीही जागा स्पर्श करा आणि ती फुटपाथच्या स्तराला झूम इन होईल.

 

विंडोज 7 प्रणाली आवश्यकता

  •                   1 गिगाहर्ट्झ (जीएचझेड) किंवा अधिक जलद 32-बिट (x86) किंवा 64-बिट (x64) प्रोसेसर
  •                    1 गिगाबाइट (जीबी) रॅम (32-बिट ) किंवा 2 जीबी रॅम (64-बिट)  
  •                     16 जीबी उपलब्ध हार्ड डिस्क स्पेस (32-बिट ) किंवा 20 जीबी (64-बिट)
  •                     डब्ल्युडीडीएम 1.0 किंवा त्याहून उच्च ड्रायव्हर सह

 

 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.