Skip Ribbon Commands
Skip to main content

यूनिकोड.ओआरजी


अक्षर अनुप्रयोग विभिन्न देशांत आणि भाषांमधून विकसित करून वापरला जातो. अशा वैश्विक परिदृश्यात, वेगवेगळ्या भाषांची अक्षरे सादर करण्याची गरज अनेक पटींने वाढू लागली. तसेच, गोंधळ टाळण्यासाठी आणि अनुप्रयोग विकसित करण्यासाठी एक मानक कूटबद्धता प्रारूप आवश्यक होते.


यूनिकोड कूटबद्धतेचा उद्देश्य आहे प्रत्येक अक्षराला व चिन्हाला एक विशिष्ट संख्या देणे - मग त्याचा मंच, प्रोग्रॅम आणि भाषा कोणतीही असो. मायक्रोसॉफ्ट, ऍपल, ह्यूलेट-पॅकार्ड (एचपी), ओरॅकल आणि इतर आघाडीच्या सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर कंपनींने यूनिकोड मानकाचा अंगीकार केला आहे. आधुनिक ब्राउजर्स, जसे इंटरनेट एक्सप्लोरर (आयई), मोझिला फायरफॉक्स, गूगल क्रोम, ओपेरा, सफारी इत्यादि, आणि विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स सारख्या संचलन प्रणाली यूनिकोड कूटबद्धतेचे समर्थन करतात.


यूनिकोड.ओआरजी वेगवेगळ्या भाषांचे यूनिकोड शिकून ते वापरण्यासाठी विभिन्न संसाधने पुरवतात आणि तुमचे अक्षर सादर करण्यास एक मार्ग देखील देतात. यूनिकोडमध्ये आताच पडलेली नवीन भर म्हणजे भारतीय रुपयाचे (आयएनआरचे) चिन्ह जे अद्याप मूळ उपकरण निर्माता (ओईएम) सोबत जाहीर झालेले नाही. तरीही, तात्काळ वापरासाठी चित्र आणि यूनिकोड जाहीर केले गेले आहेत.


यूनिकोड.ओआरजीचे संचलन दी यूनिकोड संघटने द्वारे केले जाते, जी एक अलाभकारी संस्था आहे. या संघटनेचा उद्देश्य आहे एक मानक म्हणून यूनिकोडच्या विकास, विस्तार आणि वापरास उत्तेजन देणे. संगणकावर एखादे अक्षर किंवा चिन्ह कसे आणले जाते या बद्दल काही मनोरंजक तथ्ये जाणून घेण्यासाठी तुम्ही “Where is my Character?”

 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.