Skip Ribbon Commands
Skip to main content

मुलाखतः भाषा डोमेन नेम्सवर टॅन टीन वी

 

 

 

TanTin_small.jpg 

 

तुम्ही जर आपल्या भाषेवर प्रेम असणारी व्यक्ति असल्यास, प्रोफेसर टॅन टीन वी यांचे नाव तुमच्या नजरेआड होणे शक्य नाही. नॅशनल युनिवर्सिटी ऑफ सिंगापूर (बायोइन्फॉमेटीक्स सेंटर, बायोकेमिस्ट्री विभाग, याँग लिन स्कूल ऑफ मेडीसीन) येथे काम करणा-या या भाषा उत्साहीने भाषांसाठी अद्भुत असे कार्य केले आहे विशेषतः इंटरनेटवर, भारतीय भाषांसाठी

 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंगापूरने 1994 मध्ये पहिल्या चायनीज वेबसाईटचे, 1995 साली तामिळ लिपी वापरुन पहिल्या तामिळ वेबसाईटचे व 1996 मध्ये एक बहुभाषीय वेबसाईटचे अवतरण केले. पण भाषांसाठी त्यांचे प्रमुख योगदाने आहे 'इंटरनॅशनल डोमेन नेम' (आयडीएन) यामध्ये, ज्यासोबत डोमेन नावांचे टंकन करण्यासाठी भाषा वापरल्या जाऊ शकतात. नजीकच्या काळात कोइंबतूर येथे झालेल्या 9 व्या तामिळ इंटरनेट परिचर्चा, वर्ल्ड क्लासिकल तामिळ काँग्रेसच्या निमित्ताने त्यांना तामिळनाडू सरकारद्वारे 'तामिळ इंटरनेट फ्रंटियर पुरस्कार' दिला गेला

 

भाषाइंडियासाठी एक गौरवात्मक क्षण होता जेव्हा टॅन टीन वी यांनी भाषा संगणन व विशेषतः 'इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेम'चा इतिहास, विकास व त्यांच्यासाठीचा वाव यावर एक अनन्य मुलाखत दिली. त्यांच्या मुलाखतीतील काही संक्षेप येथे दिलेले आहेत.
 
प्रश्न : आपल्याशी संवाद साधण्यास मिळण्याचा भाषा इंडियासाठी हा एक सुखद क्षण आहे प्रोफेसर टॅन टीन वी. 'इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेम' याच्या संकल्पनेविषयी कृपा करुन आपण थोडेफार सांगू शकाल का?

 

उत्तरः 'इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेम' (आयडीएन) आपल्याला त्याच गैर इंग्रजी भाषेतील वेबसाईटमध्ये (हिंदी, तामिळ वा कुठलीही भाषा) डोमेन नेम विदित करण्यास सुकर बनवते. याचा अर्थ, तुम्ही गैर-एससीआयआय चिन्हाचा इंग्रजी (लॅटिन) डोमेन नेम्सच्या जागी वापर करु शकता.


'इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेम' च्या संकल्पनेत शिरण्याअगोदर, आपण 'डोमेन नेम' या संकल्पनेला सुरु करु. एक डोमेन नेम जे अनन्यपणे एका इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी)  या पुरवत्यास ओळखते जसे की इंटरनेटवर एक वेबसाईट. डोमेन हे डोमेन नेम्स सिस्टम्स (डीएनएस) यावर आधारित असतात. डोमेन नेम्स यांचा सर्वात महत्वाचा हेतू म्हणजे न्यूमेरिकली ऍड्रेस्ड वेबसाईट्सला सहजतेने ओळखण्याजोगी व लक्षात ठेवण्याजोगी नावे पुरवणे. 15 मार्च 2010 पर्यंत 84 मिलीयन डोमेन नेम्स झालीत! पण खेद होतो की, वेबसाईट ऍक्सेस करण्यासाठी वापरकर्त्यास लॅटिन चिन्हेच वापरावी लागतील.

 

प्रश्न : प्रांतीय भाषा, डोमेन नेम्स संबंधी मागे पडणे याच्या मागचे कारण काय होते.

 

उत्तरः न्यूनतम सांमायिक भाजक म्हणून ठरवलेली अमेरिकी व एएसीआयआय चिन्हे यांच्या इतिहासकालीन वर्चस्वी वापर यामुळे गैर-इंग्रजी वापरकर्त्यांना नेट वापरण्यापास अंकुश लागला होता. लॅटिन भाषा व लिपी वापरण्याऱयांपेक्षा त्यांना न वापरणारे लोक यांच्याद्वारे इंटरनेट जास्त वापरले जाते. पण त्यांच्यासाठी कोणीच काळजी वाहिली नाही.

 

प्रश्न :मग, प्रांतीय भाषा डोमेनची मागणी कशी काय सुरु झाली?

 

उत्तरः भारतीय भाषांचा समावेश असलेली वेब पेजेस जेव्हा 90 च्या दशकात झळकू लागली, तेव्हापासूनच भाषा डोमेन नेम्सची मागणी वाढली. या रीतीने, भाषाप्रेमींनी 'इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेम'साठी दबाव देण्यास सुरुवात केली.

 

जगाच्या एकूण जनसंख्येपैकी अदमासित 83 टक्के जी गैर-इंग्रजी बोलणारी आहे, त्यांच्यासाठी डोमेन नेम हे त्यांच्या स्वतःच्या भाषेतच असावयास हवे. म्हणूनच, जगातील अधिकतम इंटरनेट वापरकर्त्यांसाठी जे अगोदर आपल्या प्रांतीय भाषेत इंटरनेट वापरु शकत नव्हते त्यांच्यासाठी एक उपयोगी इंटरनेट आणण्याच्या दिशेने आयडीएन हे एक महत्वाचे पहिले पाऊल होते.

 

आयडीएन प्रारंभी मार्टीन डस्टद्वारे डिसेंबर 1996 मध्ये प्रस्तावित होते. मला अभिमान आहे की माझ्या नेतृत्वाधीन ते प्रयोग केले गेले व शेवटी आयडीएनची स्थापना झाली. ऍप्लिकेशन्समध्ये (आयडीएनए) 'इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेम' म्हटली जाणारी रचना एक दर्जेदार म्हणून स्विकारली गेली,  व काही उच्च स्तरीय डोमेन्स मध्येही वापरण्यात येत आहे

 

प्रश्न : एका व्यक्तिस इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेम पंजीकरण करणे व वापरणे आता शक्य आहे का?

 

उत्तरः मी पहिली नमूद केल्याप्रमाणे, 1998 पासून कृती रचना केल्या व मन लावून पूर्णही केल्या गेल्या. आयडीएन यंत्रणेस दर्जेदार बनविण्यासाठी ''इंटरनेट कॉर्न्सेटीयम फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर्स'' (आयसीएएनएन) स्थापण्यात आली.

 

ध्येय संपादन करण्यासाठी त्यास 10 वर्षे लागली. ऑक्टोबर 2009 मध्ये, इंटरनेटमधील इंटरनॅशलाइज्ड कंट्री कोड उच्च स्तरीय डोमेन्स जी प्रांतीय भाषा लिपींसाठी आयडीएनए दर्जा वापरतात त्यांना आयसीएएनएनने मान्यता दिली. मे 2010 मध्ये डीएनएस रुट झोनमध्ये पहिले आयडीएन कंट्री कोड उच्च स्तरीय डोमेन्स स्थापित केले गेले. आता, आय-डीएनएस.नेट सारख्या कंपनी आहेत ज्या आधार पुरवतात डोमेन नेम पंजीकरणासाठी 60 हून जास्त भाषांत. ही सूची लवकरच आणखी वाढेल.

 

प्रश्न : हे हर्षवर्धक आहे! तर मग आपण, लोकांद्वारे लवकरच हिंदी, तामिळ व मल्याळममध्ये डोमेन नेम्स लवकरच वापर करण्याची अपेक्षा करु शकतो. पण, भाषांमध्ये इंटरनेट डोमेन नेम्स आणण्याने भाषा संगणन कशा प्रकारे लाभप्राप्त करणार आहे ?

 

उत्तरः भाषा संगणनाची मूलभूत संकल्पना आहे, कंप्यूटरचे फायदे जमावाच्या दराने लोकांस मिळवून देण्याची. प्रत्येक मानवी व्यक्तिस स्वतःच्या प्रांतीय भाषेत इंटरनेट चालवण्याचा हक्क आहे. एकदा का व्यक्तिस भाषांतील अडथळय़ांमधून माहिती चाळण्यासाठी हे हक्क वा संधी दिल्या जातात तेव्हा ती/तो समावेशित व उद्बोधित नागरिक व सर्व गोष्टींचा वापरकर्ता बनतो, विशेषतः माहिती व ज्ञान यांचा. आयडीएन द्वारा प्रदान केल्या जाणाऱयांपैकी हा एक महान लाभ असेल

 

जगातील अधिकतम जनतेस इंग्रजी भाशा अवगत नाही. इंग्रजीचे किमानही ज्ञान नसल्याने इंटरनेटवरील पुरवण्यांची सुगमता हे एखाद्या व्यक्तिसाठी खूप कठीण आहे. हे खरे आहे की प्रांतीय भाषांचा समावेश नेटवर आहे. पण, एखादी व्यक्ति त्याची सुगमता कशी मिळवू शकते?  इंग्रजीचे ज्ञान असल्याशिवाय, ती/तो डोमेन नेम्सचे टंकलेखन करुच शकत नाही (वेबसाईटचा पत्ता). एकदा का आपण हा अडथळा दूर केला, की समस्त लोकसंख्या नेटची सुगमता व लाभ मिळवण्यास  सुरु करतील. ते त्यांच्या भाषेचा दर्जेदारपणा नेटवर वाढवण्यात योगदान देऊ लागतील. या पध्दतीने, आयडीएन भाषा संगणनात मदत करणार आहे.

 

प्रश्नः एएससीआयआय किंवा लॅटिनवर आधारित डोमेन नेमसारखेच, ई-मेल आयडी हे गैर-इंग्रजी भाषिकांसमोर एक आणखी बंधन आहे. त्यांना आपल्या मातृभाषेत ई-मेल आयडी केव्हा मिळेल?

 

उत्तरः नजीकच्या काळात आयडीएनएला उच्च स्तरीय अवतरणास आयसीएएनएनने मान्यता दिली आहे. यामुळे ई-मेल आयडी केवळ इंग्रजी शब्द वापराची मर्यादा आता काढून टाकली गेली आहे. म्हणूनच, वापरकर्ते आता आपल्या स्वभाषेत ई-मेल आयडी मिळवू शकतात.

 

प्रश्नः जसे की तुम्हाला अवगत आहे, भाषाइंडिया ही भाषा संगणाविषयीची माहितीपूर्वक सामग्रीची पुरवणी आपल्या पोर्टलमध्ये अधिकतर भारतीय भाषा व इंग्रजीमध्ये करत आहे. भाषा संगणन तत्पर व तज्ञ म्हणून, भाषाइंडियाला भारतीय भाषा संगणनात तुम्ही काय मानांकन द्याल? काही सुचना आहेत का?

 

उत्तरः मी भाषाइंडियास पाहिले आहे व भारतीय भाषांचा विषय येताच मी त्याचा संदर्भ देत असे. नजीकच्या काळातच, मी श्री मनियम यांची (आय-डीएनएस.नेट इंटरनॅशनल इन्क) इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेमवरील मुलाखत भाषाइंडियात वाचली. भाषाइंडियाचा प्रयत्न हा खरोखर वाखाणण्याजोगा आहे.

 

यास एक आकर्षक त्रोत केंद्र बनवावे हा माझा सल्ला आहे. सामान्य माणसांनाही येऊ दे व त्यांनाही कळू दे की कंप्यूटर हा त्यांच्यासाठीही आहे. तुमची माहिती सुकर व सर्वसाधारण भाषेत असू दे. माहिती तंत्रज्ञानची अफाट क्षमता लोकांना कळू द्या. इंग्रजीस घाबरु नका असे त्यांना पटवून द्या कारण की प्रांतीय भाषांचाही उदय होत आहे.

 

​​ 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.