Skip Ribbon Commands
Skip to main content

सोशल नेटवर्किंगः ट्विटर


ट्विटर हे एक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे ज्याने सर्वांत आधी सूक्ष्म-ब्लॉगिंगची सुरुवात केली. याच्या द्वारे वापरकर्ते संदेश पाठवू/मिळवू शकतात - यांनाच ट्वीट असे स्हटले जाते. ट्विटरची खासियत आहे त्याचा संक्षिप्तपणा, स्हणजे, एका संदेशात 140 पेक्षा अधिक अक्षरे, चिन्हे व मोकळ्या जागा असू शकत नाहीत.


कोणतीही व्यक्ती/संघटना ट्विटर खाते तयार करून ट्वीटिंग सुरु करू शकते. हा एक खुला मंच आहे जिथे एक वापरकर्ता इतर वापरकर्त्यांचा मागोवा घेण्यास स्वतंत्र असतो. पण गोपनीयतेच्या रक्षणासाठी वापरकर्त्याचे ट्वीट्स सुरक्षित ठेवण्याचा पर्याय देखील ट्विटर वर आहे. वापरकर्त्याचे ट्वीट्स सुरक्षित ठेवण्यासाठी ट्विटर खात्याच्या मालकाने आपल्या एकूण एक अनुयायांना स्वतः मंजुरी दिली पाहिजे. ते कुठल्याही वापरकर्त्याला आपले ट्वीट्स पाहण्यापासून रोखू देखील शकतात.


या कालावधीमध्ये ट्विटर आपल्या वापरकर्त्यांसह विकसित झाला आहे. एखद्या वापरकर्त्याला दुसऱ्या वापरकर्त्याचा ट्वीट आवडून त्याला तो इतरांना सांगायचा असल्यास तो ते पुनः-ट्वीट करू शकतो. एखादा ट्वीट स्वतःचा नसून तो पुनः-ट्वीट केला असल्याचे दर्शवण्यासाठी सुरुवातीला वापरकर्ते त्याच्याआधी “RT” असे लिहायचे, आता पुनः-ट्वीट करण्यासाठी एक बटण उपलब्ध असते.


सुरुवातीच्या काळात एक ठोस व्यापारिक प्रतिमान नसल्याबद्दल ट्विटर वर टीका झाली होती, पण बिंग आणि गूगल सारख्या आघाडीच्या सर्च एंजिन्सशी करार झाल्यावर ट्विटरने धन कमवायला सुरुवात केली. आपल्या सेवा व्यापक स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांने नुकताच # नवीन ट्विटर आराखडा सुरू केला आहे.


अधिक विवरणासाठी वर www.twitter.com लॉगइन करा.

 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.