Skip Ribbon Commands
Skip to main content

​​​​​​​​​

​​

विंडोज 10 च्या विद्यमान प्रिव्ह्युकरिता रिमोट डेस्कटॉप


विंडोज 10 करिता आमच्या मायक्रोसॉफ्ट रिमोट डेस्कटॉप प्रिव्ह्यु क्लायंटला इंस्टॉल करून वापरणाऱ्या आणि आतापर्यंत आम्हाला फारच चांगला अभिप्राय कळवणाऱ्या प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद देत मला या लेखाच सुरूवात करणे आवडेल.

केंद्रीय वैशिष्ट्यांच्या संचावर काही महिने काम केल्यानंतर आम्ही अॅपला प्रिव्ह्युमधून बाहेर काढण्यास उत्सुक आहोत जेणेकरून विंडोज 10 उपकरणाचा वापर करणारा प्रत्येकजण मग तो डेस्कटॉप, टॅब्लेट, फोन किंवा Continuum for phone द्वारे वापर करीत असेल त्याला त्याच सर्वोत्तम अनुभवाचा फायदा मिळेल.

विंडोज 10 चे वितरण झालेले आहे, जर आपण स्टोरमधून Remote Desktop अॅप इंस्टॉल केले असेल तर आपण आमचे विंडोज [फोन] 8.1 अॅप वापरत असाल. आमचे नवीन विंडोज 10 युनिव्हर्सल अॅप तेव्हाच उपलब्ध असेल जर मायक्रोसॉफ्ट रिमोट डेस्कटॉप प्रिव्ह्यु अॅप इंस्टॉल केलेले असेल. आरंभिक प्रिव्ह्यु टप्पा ओलांडल्यानंतर आम्ही युनिव्हर्सल अॅपला रिमोट डेस्कटॉपच्या नावाखाली विंडोज 10 आणि विंडोज 10 मोबाईल या दोन्हींमध्ये 8.1 आवृत्तीची जागा घेण्यास सक्षम केले आहे.

पुढील काही आठवड्यांमध्ये विंडोज 10 आवृत्ती वापरणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे आपण हा ब्लॉग वाचत असतांनाही आपल्याला अपडेटेड अॅप न दिसण्याची शक्यता आहे. जर आपण आधीच त्याला इंस्टॉल केलेले नसेल तर Remote Desktop चा शोध घेतल्यावर आपल्याला अॅप स्टोरमध्ये उपलब्ध असल्याचे आढळून येईल.

अपग्रेड दरम्यान आपण खालील गोष्टींची अपेक्षा करावयास हवी:

 • डेस्कटॉप कनेक्शन्सचे जतन केले जाईल
 • वापरकर्त्यांची नावे जतन केली जातील
 • पासवर्ड पुन्हा लिहण्याची गरज भासेल
 • गेटवेजचे जतन केले जाईल
 • विंडोज फोन 8.1 मधील रिमोट रिसोर्सेस URLs चे जतन केले जाईल परंतु नवीन साइन-इन गरजेचे असेल
 • विंडोज फोन 8.1 मधील रिमोट रिसोर्सेसचे जतन केले जाणार नाही आणि पुन्हा अॅड करणे गरजेचे असेल
 • काही सामान्य सेटिंगचे जतन केले जाईल

अॅपच्या विंडोज 8.1 आवृत्तीमध्ये असलेली काही वैशिष्ट्ये अजूनही विंडोज 10 आवृत्तीमध्ये आलेली नाहीत. आम्ही पुढील अपडेटची योजना बनवत असल्याने आपल्याकरिता कोणती वैशिष्ट्ये सर्वात महत्वाची आहे हे आम्हांला कळवल्यास आम्ही आपले आभारी असू.

अजूनही उपलब्ध नसलेल्या वैशिष्ट्यांची यादी आम्ही येथे देत आहोत:

 • एकाचवेळी मल्टीपल कनेक्शन्स
 • डायनॅमिक रिझॉल्यूशन आणि रोटेशन
 • प्रिंटर रिडायरेक्शन
 • स्मार्टकार्ड रिडायरेक्शन
 • मायक्रोफोन सपोर्ट
 • लोकलाइज्ड अॅप (सध्या फक्त इंग्रजी)

जर ही वैशिष्ट्ये आपल्याकरिता महत्वाची असतील तर आम्ही शिफारस करतो की विंडोज मध्ये वितरित होणाऱ्या रिमोट डेस्कटॉप कनेक्शन्स अॅप (MSTSC) चा वापर आपण करावा.

विद्यमान प्रिव्ह्युचा अर्थ हा नाही की आम्ही कार्य पूर्ण केलेले आहे, प्रत्यक्षात याउलट स्थिती आहे. आमच्याजवळ कार्यक्षम वैशिष्ट्यांचा एक संच आहे आणि आम्ही स्टोर कमेंटचे आणि आमच्या feature requests साइटचे निरीक्षण करणे चालूच ठेवू जेणेकरून आम्हाला वैशिष्ट्यांच्या पुढील संचावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल आणि आपण अॅपकरिता नियमित अपडेटची अपेक्षा करू शकाल.

मी अॅपच्या मुख्य आवृत्तीला अॅक्सेस कसे करू शकतो?

अॅपची नॉन-प्रिव्ह्यु आवृत्ती स्टोरमध्ये Remote Desktop नावाखाली आढळू शकते. जर आपण आधीच विंडोज 10 वर आमच्या अॅपची विंडोज 8.1 किंवा विंडोज फोन 8.1 आवृत्ती वापरत असाल तर रोलआउट प्रक्रियेद्वारे आपल्या उपकरणाची अपग्रेडकरिता निवड झाल्यावर पुढील वेळी स्टोर आपल्या इंस्टॉल केलेल्या अॅप्लिकेशन्सची यादी अपडेट करतांना अॅपची आवृत्ती आपोआप विंडोज 10 मध्ये अपग्रेड करेल.

जर आपण फक्त रिमोट डेस्कटॉप प्रिव्ह्युचा वापर करीत असाल किंवा आपण रिमोट डेस्कटॉप करिता नवीन असाल तर आजच अॅप डाउनलोड करण्याकरिता स्टोरमध्ये जा आणि आपले विचार आम्हाला कळवा.

मला अजूनही स्टोरमध्ये प्रिव्ह्यु अॅप का दिसत आहे?

अॅपच्या विंडोज 10 आवृत्तीचा आरंभिक प्रिव्ह्यु कालावधी संपल्यानंतरही आपल्याला दोन अॅप स्टोरमध्ये दिसत असतील: रिमोट डेस्कटॉप आणि मायक्रोसॉफ्ट रिमोट डेस्कटॉप प्रिव्ह्यु.

जर आपल्याला फक्त आपल्या दैनंदिन रिमोटिंग गरजांकरिता अॅपचा वापर करायचा असेल तर Remote Desktop आवृत्ती इंस्टॉल करण्याची शिफारस केली जात आहे. या अॅपची अपडेट लय मंद आहे आणि धोका कमी आहे.

तथापि, जर आपल्याला प्री-रिलिज सॉफ्टवेअर वापरणे आवडत असेल ज्यामध्ये जास्त बग्ज आणि क्रॅशेस असतील, इतरांच्या आधी नवीन वैशिष्ट्यांचा वापर करणे आवडत असेल आणि इतरांकरिता उत्पादन अधिक चांगले बनवण्याकरिता अभिप्राय प्रदान करणे आवडत असेल तर Microsoft Remote Desktop Preview आपल्याकरिता आहे.

दोन्ही अॅपचे इंस्टॉलेशन एकाचवेळी केले जाऊ शकते.

Windows Phone 8.1, Windows 8.1, iOS, Mac OS X, आणि Android वर चालणाऱ्या आपल्या इतर उपकरणांकरिताही रिमोट डेस्कटॉप क्लायंट उपलब्ध आहे.​


​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

    Read More on....

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.