Skip Ribbon Commands
Skip to main content

A.G.Ramakrishnan Interview

श्री ए. जी. रामकृष्णन यांनी जीववैद्यकीय अभियांत्रिकीत आयआयटी, मद्रासकडून त्यांची पीएचडी मिळवली. बीपीएल इंडिया व फेत्झर संस्थान, कलामझू, यूएसए बरोबर काम केल्यानंतर ते इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्सशी संलग्न झाले, जेथे ते विद्यमानात प्राध्यापक असून वैद्यकीय बुध्दीमत्ता व भाषा स्थापत्यशास्त्र (एमआयएलई) प्रयोगशाळेचे मुख्य आहेत. त्यांनी थंगम वासुदेवन पुरस्कार (रॉयल कॉलेज ऑफ फिजीशीयन्स ऍंड सर्जन्स, ग्लासगो) व तरुण शोधकर्ता पुरस्कार (डीएसटी, भारत सरकार) प्राप्त केले. भारतीय भाषा तंत्रज्ञान निरसने व औषधांत प्रतिमा कार्यान्वयन हे त्यांच्या परिशोधातील कुतुहलयुक्त समाविष्ट विषय. ते आयइइइ, औषधी व जीवशास्त्र व संकेत कार्यान्वयन समाजाचे वरिष्ठ सदस्य आहेत. डिसेंबर 2008 पर्यंत ते भारतीय जीववैद्यकीय स्थापत्यशास्त्र समाजाचे अध्यक्ष होते. आयईटीई व आयई (भारत) यांचे ते जोडीदार आहेत. त्यांनी 6 पीएचडी, 12 परिशोधाद्वारे गुरुत्व व 48 स्थापत्यशास्त्र विद्यार्थ्यांतील गुरुत्वासाठी दिशानिर्देशन केले आहे. तामिळमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय परिचर्चेचे, प्रकल्प सल्लागार समिती, भारतीय भाषांसाठी बहुभाषीय गोष्टी सुसंगतता व वैद्यकीय परिशोधाच्या भारतीय योजना मंडळाच्या प्रकल्प चाचणी समितीचे ते सदस्य आहेत. सध्या, ''भरतीय भाषांतील ऑनलाईन हस्तलेखनांची मान्यता'' या राष्ट्रीय स्तरावरील परिशोध प्रकल्पाला दिशानिर्देशन करत आहेत. अंध व्यक्तिंसाठी भारतीय भाषांचे छापील पुस्तके स्वयंचलित वाचक'' याच्या विकसनात त्यांचा मोठा वाटा आहे. एमआयएलई यांनी bookshare.org, युएसएशी अंकाधारित तामिळ व कन्नड पुस्तके ऑनलाईन उपलब्ध व्हावीत यासाठी संगनमत केले आहे.

भारतीय विज्ञान संस्थानांनी भारतीय संगणकीय कार्यक्रमांत कुतुहल कसे दाखविले? हे कधी सुरु झाले?
जवळपास 2000 साली. फक्त 10 आकडे हाताळत असूनही, बँकांमधील प्रतीके क्रमांक जाहीर करण्याची प्रणाली खूपच निकृष्ट असल्याचे मी पाहिले. सोप्या रितीने उपलब्ध तरणोपाय व अद्ययावतता या दोन्ही कारणांनी जगभरातील लोक फक्त इंग्रजीमधीलच भाषा तंत्रज्ञानांवरच काम करतात हे मला समजले, जपानी, चीनी व भारतीयसुध्दा इंग्रजीतच वाणी आकलनावर काम करत होते. म्हणूनच इंग्रजीवर काम न करता फक्त भारतीय भाषांवर काम करायचे ठरविले. मला हे उमगले की भारतीय भाषांचा हळूवार –हास होत आहे व भारतातील मुख्य शहरांत केवळ करमणूक व प्रसारमाध्यमेच मुख्यत्वे आहेत ज्यांनी आपल्या भाषांना जिवित ठेवले आहे. स्वातंत्र्यानंतर 63 वर्षांनी, एक देश म्हणून आपल्या भाषांच्या विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानांच्या जगभरातील एकसुरात आपण तंत्रशुध्दतेनेकाहीच केलेले नाही. त्यामुळेच, जरी कोणाला भारतीय भारतीय भाषांत शिकायची इच्छा असूनही त्यासाठी पुस्तके नाहीत, राष्ट्रभाषा हिंदीला धरुन कुठल्याही भाषेत तांत्रिकी शब्दांसाठी स्तराचा शब्दकोश नाही. ही धोक्याची सूचना आहे, कारण आपल्या पुढल्या पिढयांसाठी आपली पूर्ण संस्कृती व वांङमय अनुपलब्ध असेल. जपान, जर्मनी व फ्रान्समध्ये लोक त्यांचे पीएचडी प्रबंधलेखन त्यांच्या स्वत:च्या भाषेत करु शकतात. यासाठी खरोखरच काहीतरी करावे असे मला वाटले.
इंडिक संगणकीकरणासाठी भारतीय विज्ञान संस्थानाने काय आव्हाने व संपादने हाताळली?
तामिळ व कन्नड ओसीआरमध्ये व लिखितांतून वाणीमध्ये परिवर्तन प्रणालीत, एमआयएलई प्रयोगशाळेत, आमच्याकडे चांगल्या मूळपंती उपलब्ध आहेत. आमची लिखितांतून वाणीत परिवर्तन प्रणालीत http://mile.ee.iisc.ernet.in/tts या संकेतस्थळी प्रात्याक्षिकाच्या रुपात उपलब्ध आहे. सिंगापूरमधील एका तामिळ शिक्षिकेने मला सांगितले की ती आमचा टीटीएस त्यांच्या प्रकल्पांसाठी व त्यांच्या विद्यार्थ्यांना तामिळ शब्दोच्चार शिकविण्यासाठी वापरते! जगभरातून 100 पेक्षा जास्त लोकांकडून आम्हाला परिणामपुरवणी मिळाली आहे व 1000 पेक्षा जास्त लोकांनी सांकेतिक प्रात्याक्षिकांची चाचणी केली आहे.
येथील खाजगी संस्थांबरोबर संगनमताने आम्ही तीन नमुनापत्रे भरणीची आवेदने घडवली, ज्यात आमची हस्तलिखित आकलनाची यंत्रे लोकांनी हाताने भरलेल्या नोंदी ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकतात. भारतात हा परिशोधाचा हा एक नवा व कठिण भाग असल्याने सद्य काळात ही आवेदने जवळपास 80 टक्केपर्यंत अचूकता देऊ शकतात. भारतीय विज्ञान संस्थानांचे संलग्न मुख्याधिकारी, प्राध्यापक एन. बालकृष्णन हे हिंदी व अन्य भारतीय भाषांचा अंर्तभाव असलेल्या यांत्रिकी भाषांतरावर कार्यरत आहेत. हस्तलेखन ओसीआर विकासात तुम्हाला ओढ कशी निर्माण झाली?
छापील ओसीआरवर काम करताना हस्तलेखनाच्या आकलनावर कुतुहल साहजिकच वाढत गेले, कारण की कुंजीपटलाच्या सहाय्याने संगणकात भारतीय भाषांत माहिती भरण्यासाठी हे एक नैसर्गिक माध्यम होईल. ज्या लोकांना इंग्रजी येत नाही व कुंजीपटलाचा वापरही कळत नाही त्यांच्यासाठी हस्तलेखनाने भरणी जास्त सुकर व कमी किचकट होईल.
हस्तलेखन ओसीआर भारतीय भाषांसोबत कसे काम करतो?
टीडीआयएल, एमसाआयटीद्वारे पुरस्कृत एका राष्ट्रीय सुसंगती परिशोध प्रकल्पाचा मी अग्र आहे जेथे आयआयटी मद्रास, आयआयटी हैद्राबाद, सिडीएसी पुणे व आयएसआय कोलकाताकडचे भागीदार अनुक्रमे तेलुगू, मल्याळम, हिंदी व बांगलावर कार्यरत आहेत. आयआयएससी तामिळ व कन्नडवर कार्यरत आहेत. लर्नफन सिस्टम्स चेन्नई, सीके टेक्नॉलॉजीस, चेन्नई व सिडीएसी पुणे यांनी सुध्दा अपघात माहितीएकत्रीकरण नमुना आमच्या हुषारांद्वारे विकसित आकलन यंत्रांना वापरुन तयार केलेत. टीडीआयएल, भारत सरकार द्वारे पुरस्कृत सुसंगतता पध्दतीच्यावेळेपासून अवघ्या तीन वर्षांपूर्वीच गंभीरतेने गंभीरतेने परिशोध सुरु झाला. आम्ही शब्दस्तरावर सुलेखित लेखनावर 85 टक्के अचूकता मिळवली. कुठल्याही भाषा तंत्रज्ञानाच्या परीशोधात जर आपल्याकडे टीप देणारे माहितीकोष असल्यास वेग बळावतो. आता होणारी दिरंगाईला कारण म्हणजे अशा माहिती कोषांचा अभावच आहे. म्हणूनच, वरील सर्व भाषांमधील सुलिखित माहितीकोषांना गोळा करण्यासाठी आम्ही ब–याच प्रमाणत उर्जा खर्च केली आहे. पहिले आवेदन लोकांनी वापरण्यासाठी अजुन 3 वर्षे सहज लागतील. लवकरच, आसामी व पंजाबी (गुरुमुखी) वर काम करण्यासाठी काही संस्थांना भागीदार म्हणून आम्ही संलग्न करणार आहोत. मी योजना आखत आहे की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कादंबरी निर्माण करावी, करार आवेदनांसाठीच्या व कदाचित हस्तलेखन आकलनाचा अंतर्भाव असेल अशा कुतुहलपुर्ण खेळांसाठी एक राष्ट्रस्तरीय तांत्रिक चढाओढ आयोजित करण्याची. भारतीय भाषांचा विविध संगणकीय उपकरणांचा वापर वाढावा ज्यात हातात धरण्यायोग्य उपकरणांचाही अंतर्भाव असेल हाच याच्या मागचा हेतु आहे.
अन्य कुठल्या भारतीय भाषा आगेत ज्यात संगणकीय गतिविधी कार्यरत आहेत?
बहुभाषीय (भारतीय भाषा व इंग्रजी) तामिळ व कन्नडमध्ये प्रलेख ते वाणी संयोजन व छापील लेख आकलन (ओसीआर) आमचे सद्य परिशोध प्रकल्प आहेत. लवकरच, उच्च प्रतीच्या तामिळ व कन्नड भाषांतारावर काम सुरु करण्याचे योजित आहे, तसेच स्वतंत्र भाषा वाणी आकलन, जे बहुभाषीय भारतीय स्थितींसाठी सुयोग्य असेल.
इंडिक संगणकीकरणात काय संपादन करण्याचे आपले लक्ष्य आहे?
इतर इंग्रजी भाषा जाणत्या लोकांप्रमाणेच त्या भारतीय लोकांना जे इंग्रजी अजिबात जाण्त नाहीत, संगणक व माहिती तंत्रद्यानाशी उच्च प्रमाणात सुगमता असावी. कुठल्याही प्रकारची वाचन दुर्बलता (अंधपणामुळे वा लिपीबद्दलच्या न्यानाच्या अभावामुळे) कुठल्याही भारतीय भाषेतील कुठलेही छापील पुस्तक वाचण्यासाठी लोकांना अडथळा बनू नये. कुठल्याही भारतीयासाठी कुठल्याही भारतीय भाषेत उच्च साहित्य, संगीत, विद्यान व तंत्रद्यान व प्रत्येक अन्य माहिती, वाढत्या वेगाने व सुकरतेने शिकण्यासाठी सहजतेने उपलब्ध व्हावी. हे माझ्या जीवनकालात नक्कीच व्हायला हवे.
इंडिक संगणकीकरणासाठी भारतीय नागरिकांनी काय करावयास हवे?
भारतीय भाषेतील कुंजीपटलावर टंकलेखन शिकावयास सुरुवात करावी, जे इंग्रजी भाषेकरिता विद्यमान क्यूडबल्यूईआरटीवाय कुंजीपटल आहे त्यापेक्षा अधिक कार्यक्षमतेसाठी बनविले गेलेत. स्थापत्यशास्त्र विद्यार्थी, विशेषतः संगणक विद्यान विद्यार्थ्यांनी खूपसे सामाजिक प्रकल्प जसे विकीपेडिया, जेणेकरुन कुठल्याही क्षेत्रातील माहितगारांस त्यांच्या क्षेत्रात भारतीय भाषेत उच्च प्रतीच्या गोष्टी घडविता येतील. अशीही संकेतस्थळे असावीत जी जगाच्या कुठल्याही ठिकाणाहून वापरुन मातब्बर लोकांना किचकट माहितीकोष बनविता यावे, जसे की समांतर कौर्पोरा, यंत्र भाषांतरासाठी बोलीच्या भागांसाठी तणाव व म्हणी ज्यात कौर्पोराचा अंतर्भाव आहे अशा विविध संगणकीय बहुभाषीय परिशोध अभ्यासात भारतीय भाषांतील ध्वनी माध्यमात व उत्साहवर्धक शैक्षाणिक गोष्टी ज्यात भारतीय भाषांतील प्रसारमाध्यमांचाही अंतर्भाव असेल.
This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.