Skip Ribbon Commands
Skip to main content

​​​​​​​​

प्रोव्हिजनिंग पॅकेजेस – काय करावे आणि काय करू नये?


हाय, विंडोज 10 च्या मित्रांनो!

आज मला माझ्या एका आवडीच्या विषयावर बोलायचे आहे: विंडोज 10 प्रोव्हिजनिंग.

इंटरनेटवर सध्या एका गोष्टीविषयी खूपच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे नवीन विंडोज 10 तैनातीची पद्धत (उर्फ प्रोव्हिजनिंग) खरंच व्यावहारिक स्थितीत होते का. आणि खरे बघता माझ्या अनुभवानुसार या पद्धतीचा अवलंब करतांना फारसे कुणी ग्राहक दिसत नाही आहे. याची पडताळणी करण्याकरिता मी मायक्रोसॉफ्ट जपान मध्ये एक अंतर्गत सर्वेक्षणही केले आणि मला आढळले की आघाडीच्या 200 कंपन्यांपैकी 60 कंपन्यांनी विंडोज 10 तैनातीच्या पद्धतीची निवड केलेली आहे: त्यांच्यापैकी 90% टक्क्यांनी पारंपारिक "वाईप अँड लोड" चा अवलंब करणे निवडलेले आहे.

का? अर्थात, त्यामागे बरीच कारणे आहेत. मला समजलेले पहिले कारण आहे की ग्राहकांना पारंपारिक तैनातीच्या पद्धतीची सवय आहे जी विंडोज 10 वर उत्तमरित्या कामही करते. त्यांनी कदाचित संपूर्ण तैनाती प्रक्रियेचे दस्तऐवजीकरणही केलेले असू शकते आणि कदाचित त्यांना संपूर्णपणे नवीन तैनाती संरचना आणि दस्तऐवजीकरणाचा खर्चही वाचवायचाही असू शकेल. उदाहरणार्थ जपानमध्ये आमचे अधिकांश ग्राहक मोठ्या प्रमाणावर उपकरणांची बदली करण्याच्या विशिष्ट वेळीच विंडोज 10 वर स्थानांतरित होण्याचा विचार करतात. या विशिष्ट प्रकरणामध्ये, अधिकांश वेळी ते "वाईप अँड लोड" पद्धतीचा अवलंब करतात.

माझ्या मते दुसरे कारण असू शकते की प्रोव्हिजनिंग पद्धतीच्या काही मर्यादा आणि आव्हाने आहेत: उदाहरणार्थ, दुकानामधून घेतलेल्या विंडोज 10 उपकरणामधील ब्लॉटवेअरला काढण्याचा एखादा सोपा उपाय ते प्रस्तुत करत नाही (आपण याची स्क्रीप्ट लिहू शकता परंतु बाजारामध्ये उपलब्ध सर्व उपकरणांकरिता ती एकाच तऱ्हेने काम करणार नाही). आणखी एक कारण असू शकेल की आवृत्ती अपग्रेड फक्त प्रो ते (किंवा ईडीयू) एंटरप्राईजपर्यंत काम करत असेल, पण प्रत्यक्षात आपण खरेदी करू शकणारे अधिकांश उपभोक्ता उपकरणे विंडोज 10 होम एडिशनसोबत येतात (वास्तविक पाहता होम ते प्रो, व मग प्रो ते एंटरप्राईज मध्ये जाण्याकरिता PPKG चा वापर करणे हा एक मार्ग उपलब्ध आहे). आणि शेवटचे कारण म्हणजे विंडोज ICD टूल जो कदाचित (सध्या) सर्वात वापरकर्ता अनुकूल साधन नसेल (यामध्ये सेटिंगबद्दल काही माहितीची आणि काही इनपुट स्वरूपांची कमतरता आहे).

माझ्याकरिता, प्रोव्हिजनिंग फक्त एकाच परिस्थितीकरिता वापरले गेले पाहिजे: BYOD. हा एक उपाय आहे जो व्यवसायातील काही गुंतागुंतींच्या स्थितींवर तोडगा शोधू शकतो जसे व्यावसायिक प्रवासादरम्यान विक्री प्रतिनिधीचे उपकरण हरवणे/तुटणे/चोरी जाण्याचा प्रकार घडू शकतो आणि तेव्हा आयटी तंत्रज्ञानाच्या हस्तक्षेपाशिवाय त्याला बदलण्याची गरज भासते. त्याच्या उपकरणाला एंटरप्राईज आवृत्तीवर अपग्रेड करून, ऑफिस 2016 इंस्टॉल करून, VPN प्रोफाइल सेट करून आणि आवश्यक असल्यास डोमेन जोडून त्वरित काम पुन्हा सुरू करण्यास प्रोव्हिजनिंग त्याला मदत करेल.

इतर कुठल्याही परिस्थितीकरिता, कुठल्याही नवीन उपकरणांकरिता आपण इन-प्लेस अपग्रेड (विंडोज 7, 8, 8.1 उपकरणांवरून) किंवा वाईप अँड लोड चा विचार करायला पाहिजे.

जरी आपणाला प्रोव्हिजनिंग पद्धतीमध्ये काही मर्यादा येत असल्या, तरी मला PPKG मधून मिळालेल्या सर्व चाचणी निष्कर्षांना येथे एकत्र करायचे होते (काय काम करते आणि काय नाही) जेणेकरून आपल्या गरजांकरिता सर्वोत्तम असणारी तैनातीची पद्धत ठरवतांना आपल्या हाती सर्व सूत्रे असतील.

 • कॉर्पोरेट इन्फ्रामध्ये उपकरणाची नोंदणी करा
  • Domain Join –> OK
   • [Runtime Settings]>[Accounts]>[Computer Account]
    • [Account] domain\account (i.e. contoso\admin)
    • [DomainName] domain FQDN (i.e. contoso.com)
    • [Password] domain join account password
  • Azure AD Join –> NO (PPKG द्वारे प्रस्तुत एनरॉलमेंटच्या सत्यापन पद्धतीशी ते संबंधित आहे जे ऍझूर AD जॉईन व तसेच इनट्युनशी अनुकूल नाही)
  • Intune enrollment –> NO (वरिलप्रमाणे)
  • SCCM On-prem MDM enrollment –> OK (वैयक्तिकरित्या तपासलेले नाही परंतु तसे करणे स्पष्ट करणारा एक विलक्षण लेख आढळलेला आहे)
 • प्रोफाईल्स
  • WIFI –> OK
   • [Runtime Settings]>[ConnectivityProfiles]>[WLAN]>[WLANSetting]
    • Add the [SSID] of the WiFi
    • Under [WLANXmlSettings], fill [AutoConnect], [HiddenNetwork], [SecurityKey] and [Security Type]
  • Certificates –> OK
   • For Root CA Certificate, [Runtime Settings]>[Certificates>[RootCertificates]
    • Type a [CertificateName] and click [Add]
    • [CertificatePath] path to the CER root CA certificate file
  • Email profile –> BYOD परिस्थितीमध्ये आपल्याला डोमेन किंवा ऍझूर एडी खात्याची माहिती नसते, मला वाटत नाही की प्रोव्हिजनिंगसोबत असे काही शक्य असेल.
 • OS कस्टमायझेशन
  • Start Menu –> OK (टिपण: हे संगणकावरील विद्यमान वापरकर्त्यावर लागू होत नाही परंतु इतर कुठल्याही नवीन वापरकर्त्यावर लागू होते)
  • Wallpaper –> NO (इमेज फाईल कॉपी करा परंतु अप्लाय करू नका, ते अपेक्षित वर्तन आहे का याची स्पष्ट कल्पना नाही. यावर आम्ही आपल्याला नंतर अपडेट करू)
  • Local Account creation –> OK
   • [Runtime Settings]>[Accounts]>[Users]
   • Type a [User Name] and click [Add]
   • [Password: password of the newly created account
   • [UserGroup] add the user to "Administrators" group for instance
  • UWF –> OK
   • [Runtime Settings]>[UnifiedWriteFilter]
   • [FilterEnabled] TRUE
   • [OverlaySize] in MB (i.e. 1024)
   • [OverlayType] select RAM or Disk
   • [Volumes]
    • Type the [DriveLetter] to filter (i.e. "C:") and click [Add]
    • [Protected] TRUE
  • Bitlocker –> NO (स्क्रीप्टमध्ये manage-bde कमांड वापरण्याकरिता yes)
  • Edition upgrade –> OK (फक्त Pro/Edu ते Enterprise करिता)
   • [Runtime Settings]>[EditionUpgrade]
   • [UpgradeEditionWithProductKey] एंटरप्राईज प्रॉडक्ट की लिहा
 • Universal Applications
  • Install –> OK (साईडलोडिंग सक्षम करण्यास विसरू नका, प्रमाणपत्र, डिपेंडंसीज व तसेच अॅप फाइल तैनात करा)
   • To enable sideloading, [Runtime Settings]>[Policies]>[ApplicationManagement]>[AllowAllTrustedApps]>[Yes]
   • To deploy certificate, [Runtime Settings]>[Certificates]>[TrustedPeopleCertificates]
    • Type [CertificateName] and click [Add]
    • [TrustedCertificate] specify the path to the app certificate file
   • To import app with dependencies, [Runtime Settings]>[UniversalAppInstall]
    • Type [PackageFamilyName] and click [Add] (can be any name)
    • [ApplicationFile] specify the ".appxbundle" file
    • [DependencyAppxFiles] एकापाठोपाठ एक याप्रकारे सर्व डिपेंडंसीज फाईल्सना अॅड करा
  • Uninstall –> OK
   • [Runtime Settings]>[UniversalAppUninstall]
   • अश्या संगणकावर जेथे अनइंस्टॉल करण्याचे अॅप इंस्टॉल केलेले असतील तेथे पॅकेज फॅमीली नेम शोधण्याकरिता get-appxpackage ही पॉवरशेल कमांड चालवा.
   • वरील कमांड वापरून [PackageFamilyName] found टाईप करा.
 • Win32 applications installation
  • MSI –> OK
   • [Runtime Settings]>[ProvisioningCommands]>[DeviceContext]
   • [CommandFiles] add the MSI file
   • [CommandLine] type the command line to install the MSI package: "msiexec.exe /i xxx.msi /q"
  • Office –> OK (WICD वापरून ते कसे करायचे हे स्पष्ट करण्याकरिता मी दुसरा लेख लिहणार आहे).

प्रोव्हिजनिंग सोबत काय शक्य आहे हे ठरविण्याकरिता ही यादी आपली मदत करेल ही आशा आहे. अर्थातच, विंडोज ICD मध्ये उपलब्ध असलेल्या सर्वच सेटिंग्जचा अंतर्भाव मी केलेला नाही, त्यामुळे जर आपल्याला दुसरी कुठली सेटिंग्ज पाहिजे असल्यास तिचा विंडोज ICD मध्ये शोध घेण्याची शिफारस मी आपल्याला करतो.:)


​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

    Read More on....

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.