Skip Ribbon Commands
Skip to main content
 

ऑफिस 2007

 

ऑफिस 20007 एक शक्तिशाली लेखन कार्यक्रम आहे जो लेखन उपकरणांच्या एका व्यापक संचाची जुळणी, वापरायला सोप्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस फ्ल्युएंट उपयोगकर्ता इंटरफेसशी करून तुम्हाला दस्तऐवज तयार करणे व त्यांचा सहवापर करणे सोपे करतो.

ऑफिस 20007 माहिती क्षेत्रात काम करणाऱ्यांना व्यावसायिक दिसणारी सामग्री अधिक लौकर तयार करण्यास मदत करते. बऱ्याच नवीन उपकरणांद्वारे पूर्वनिर्धारित भाग आणि शैलींच्या सहाय्याने तुम्ही दस्तऐवज पटकन तयार करू शकता, तसेच ब्लॉग्स थेट वर्डमधून लिहू आणि प्रकाशित करू शकता. मायक्रोसॉफ्ट ऑफिस शेअरपॉइंट सर्व्हर 2007 आणि नवीन एक्सएमएल-आधारित फाइल प्रारूपांशी प्रगत एकत्रीकरणाने ऑफिस वर्ड 2007 एकत्रित दस्तऐवज प्रबंधन तयार करण्यासाठी आदर्श ठरते.

 

स्मार्ट आर्ट

स्मार्ट आर्ट आकृत्या आणि एका नव्या चार्टिंग एंजिनच्या सहाय्याने तुम्ही दस्तऐवजांना एक व्यावसायिक रूप देऊ शकता. मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल 2007 स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॉवरपॉइंट 2007 सादरीकरण ग्राफिक प्रोग्रॅमसह आकृतिकरण आणि चार्टिंगच्या सहवापराने तुमच्या दस्तऐवज, स्प्रेडशीट आणि सादरीकरणाला एकसारखे स्वरूप येण्यास मदत मिळते.

 

इक्वेशन बिल्डर

इक्वेशन बिल्डर खरी गणितीय चिन्हे, पूर्वनिर्मत सूत्रे आणि ऑटोमॅटिक फॉर्मेटिंग वापरून तुम्हाला एडिटेबल इन-लाइन गणितीय इक्वेशन्स तयार करण्यास मदत करतो.

सायटेशन प्रबंधक आणि संदर्भ निर्माता तुम्हाला संदर्भ, तळटीपा, अंतटीपा, अनुक्रमणिका, आकड्यांचा किंवा प्राधिकारांचा तक्ता तयार करण्याची क्षमता देतो.

ऑफिस फ्ल्युएंट उपयोगकर्ता इंटरफेस तुम्हाला गरज असेल तेव्हां, हवी ती उपकरणे स्पष्ट आणि व्यवस्थित रूपात उपलब्ध करून देतो. लाइव्ह दृश्य प्रिव्ह्यू, पूर्वनिर्धारित शैली संच, तक्त्यांचे प्रकार आणि इतर सामग्री तुम्हाला ऑफिस वर्ड 2007 च्या क्षमतांचा अधिक फायदा घेण्यास मदत करते.

 

बिल्डिंग ब्लॉक्स

ऑफिस वर्ड 2007 नेहमी वापरली जाणारी सामग्री तुमच्या दस्तऐवजांत सामील करण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक्स प्रस्तुत करतो. मुखपृष्ठांचा संच, उक्ति, हेडर आणि फूटर यांच्या पूर्वनिर्धारित संचातून निवड करून तुमच्या दस्तऐवजांना अधिक व्यावसायिक स्वरूप द्या. कायदेशीर नाकबुली लेख किंवा इतर नेहमी वापरली जाणारी सामग्री जोडण्यासाठी तुम्ही स्वतःचे बिल्डिंग ब्लॉक्स देखील तयार करू शकता.

 

चार्टिंग

3-डी आकार, पारदर्शिता, छाया आणि इतर प्रभावांने युक्त नवी चार्टिंग आणि आकृतिकरण वैशिष्ट्ये तुम्हाला व्यावसायिक दिसणारे ग्राफिक्स तयार करण्यास मदत करतात ज्याने दस्तऐवज अधिक प्रभावी होतात.

क्विक स्टाइल्स आणि डॉक्युमेंट थीम्स वापरून तुम्ही तुमच्या संपूर्ण दस्तऐवजात लिखाण, तक्ते आणि ग्राफिक्सचे स्वरूप बदलून तुमच्या पसंतीच्या शैली किंवा रंगसंगतीचे करू शकता.

 

शेअरपॉइंट

ऑफिस वर्ड 2007 मधे तुम्ही दस्तऐवज तुमच्या सहकर्मींशी शेअर करून त्यांचे मत सहज घेऊ शकता. तुम्ही तुमच्या दस्तऐवजांचे अवांछित वितरण टाळू सकता आणि त्यांच्या प्रकाशनापूर्वी त्यांतील खाजगी टिप्पण्या किंवा छुपे लिखाण काढले जाणे सुनिश्चित करू शकता. ऑफिस शेअरपॉइंट सर्व्हर 2007 वर काम करताना महत्वपूर्ण दस्तऐवजांवर मत व्यक्त करणे किंवा आढावा आणि मंजुरी कार्यात भाग घेणे देखील आता सोपे आहे.

ट्राय-पेन रिव्ह्यू पॅनल एका वर्ड दस्तऐवजाच्या दोन आवृत्यांची तुलना आणि एकीकरण सोपे करतो, ज्याने तुम्ही तपासकर्त्यांने केलेले छोट्यातले छोटे बदल देखील सहज शोधू शकता.

 

डिजीटल हस्ताक्षर

दस्तऐवजामधे डिजीटल हस्ताक्षर समाविष्ट केले जाऊ शकतात, ज्याने प्रकाशनानंतर त्यात बदल न केला गेल्याची पुष्टि इतर लोक करू शकतात. यात एक नवी हस्ताक्षर पंक्ति जोडली जाऊ शकते ज्यावर वर्डचे इतर वापरकर्ते हस्ताक्षर करू शकतात किंवा तुमच्या दस्तऐवजांवर एक दिसणारे डिजीटल हस्ताक्षर करू शकतात.

 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.