Skip Ribbon Commands
Skip to main content

मायक्रोसॉफ्ट रिसर्च


मायक्रोसॉफ्ट रिसर्च (एमएसआर) ही एक विश्वविख्यात संघटना आहे, जिची स्थापना १९९१ मध्ये झाली होती - संगणक कार्यात सामान्य आणि प्रयुक्त संशोधन कार्य हिच्या केंद्रस्थानी आहेत. जगभरात ८ शाखा आणि ८०० पेक्षा अधिक संशोधकांसह, ही संगणक शास्त्राच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी संस्था आहे.


संगणक कार्यातील ५५ विभिन्न क्षेत्रांत सतत संशोधन केले जात आहे. एमएसआरला काही ख्यातनाम प्रतिभेंच्या सेवा प्राप्त आहेत, ज्यांत सुप्रसिद्ध टर्निंग पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे.


एमएसआर संकेतस्थळावर प्रकाशने विभागात बहुविध प्रकाराची संसाधने उपलब्ध आहेत जी नवखे आणि प्रगत, दोन्ही प्रकारच्या संशोधकांच्या उपयोगाची आहेत. माहिती सहजपणे मिळू शकण्यासाठी शीर्षक, लेखक आणि सारांश या तीन्ही प्रकारे शोध घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रकाशित सामग्री फिल्टर करण्याची सुविधा देखील आहे.


संशोधनातील नवीनतम तंत्रज्ञान जाणून घेण्याचे इच्छुक प्रकल्प विभाग पाहू शकतात - जेथे नवीनतम संशोधन आजमावण्यासाठी माहिती आणि दिशानिर्देश आहेत. संशोधन विषय आणि स्थळासाठी फिल्टर्स उपलब्ध आहेत. योग्य माहितीची ओळख करण्यासाठी प्रथम-निर्दिष्ट अतिशय उपयोगी आहे.


तुम्ही अवचित माहिती मिळवणारे असा किंवा गंभीरतेने शिक्षण घेणारे, अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही नेहमीच व्हीडियो पाहू शकता. अधिक विवरणासाठी  http://research.microsoft.com/ वर लॉगइन करा.

 

 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.