Skip Ribbon Commands
Skip to main content

ऑफिसकरिता विज्युअल स्टुडियो


      मायक्रोसॅफ्ट ऑफिसला समस्या निवारणासाठी मुख्य निदानक म्हणून वापरुन, वर्ड मधील वर्ड प्रोसेसिंग गुणधर्म, एक्सेलमधील डेटा पृथक्करण गुणधर्म तसेच आऊटलूकमधील ईमेल पृथक्करण गुणधर्म यासारख्या माहीत असलेल्या मायक्रोसॅफ्ट ऑफिसच्या युजर इंटरफेस व टूल्सचा लाभ घेऊ शकता. ऑफिस ऍप्लीकेशन्सना कस्टमाईज करण्यासाठी तुम्ही विज्युअल स्टुडियोत उकल विकसित करु शकता तसेच आपल्या व्यवसाय प्रक्रियांसाठी हव्या असलेल्या विशिष्ट गुणधर्मांना जोडू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही वर्डला करार निर्माणकात बदलू शकता जे पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या भागांतून करार बनवते, ज्यांना एडिट केले जाऊ शकते किंवा नाही सुध्दा. एक्सेल सोबत, विविध प्रकल्पांसाठी तुम्ही एक ऑटोमेटेड अंदाजपत्रक वर्कशीट कस्टमाईज करु शकता. तुमचे वापरकर्तेही ऑफिस उकल ऑफलाईनही घेऊ शकतात, ज्यामुळे एखादे वेब आधारित आर्किटेक्चर वापरत असताना होणा-या कष्टांच्या तुलनेत गुंतागुंतीची उकले अधिक प्रत्यर्शी बनतात.


डॉक्यूमेंट-स्तराचे कस्टमायजेशन बनलेले असते एका संरचनेचे, जे निगडीत असते मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा एक्सेलमधील एका एकल डॉक्यूमेंटशी, वर्कबूकशी किंवा टेंपलेटशी. ते डॉक्यूमेंट उघडताच ही संरचना लोड होते. जेव्हा निगडीत डॉक्यूमेंट उघडले जाते तेव्हाच कस्टमायजेशनमध्ये निर्माण केलेल्या तुमच्या फीचर्स उपलब्ध होतात.  कस्टमायजेशन ऍप्लीकेशनप्रमाणे बदल करु शकत नाही, जसे की कुठलेही डॉक्यूमेंट उघडे असताना एक नवा मेनू आयटम किंवा रीबन टॅब दर्शवणे.


विज्युअल स्टुडियोत टूल्सचा समावेश असतो जी डॉक्यूमेंट-स्तराचे कस्टमायजेशन निर्माण करण्यास मदत करतात. तुम्ही कस्टमाईज करत असलेल्या डॉक्यूमेंटला विज्युअल स्टुडियोत डिजाईन सर्फेस म्हणून स्थापन केले जाते, ज्यामुळे ड्रगिंग व ड्रॉपिंग कंट्रोल्सचा त्यावर वापर करुन डॉक्यूमेंटला रचण्यात तुम्हाला सबलता मिळते. खुपशी अन्य विज्युअल स्टुडियो वैशिष्टय़े डॉक्यूमेंट स्तराच्या प्रकल्पांत उपलब्ध आहेत, जसे की विंडोज फॉर्म्स कंट्रोल्स, ड्रग अँड ड्रॉप डेटा बाइंडिंग, व एक इंटीग्रेटेड डीबगर.


ऍप्लीकेशन-स्तराचे ऍड-इन्सर्ट  हे  बनलेले असते एका रचनेचे जे निगडीत असते मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍप्लीकेशनशी. नमुनेदारपणे, ऍड-इन्सर्ट रन करते जेव्हा निगडीत ऍप्लीकेशन चालू केले जाते, तरीसुध्दा, वापरकर्ते ऍप्लीकेशन अगोदरपासून चालू असल्यानंतरही ऍड-इन्सर्ट लोड करु शकतात. कोणते डॉक्यूमेंट उघडे आहे यावर निर्भर नसून, तुम्ही निर्मित केलेली ऍड-इन्सर्टमधील वैशिष्टय़े त्याच ऍप्लीकेशनसाठी उपलब्ध असतात.
तुम्हाला ऍड-इन्सर्ट निर्माण करण्यासाठीच्या टूल्सचा विज्युअल स्टूडियोत समावेश असतो. ऍड-इनचे प्रतिनिधीत्व करणा-या एका ऑटोमॅटीकली जनरेटेड क्लासचा ऍड-इन प्रोजेक्ट्समध्ये समावेश असतो. हा क्लास वैशिष्टय़े व गतिविधी पुरवतो ज्या तुम्ही होस्ट ऍप्लीकेशनच्या ऑब्जक्ट मॉडेलला ऍक्सेस करण्यासाठी तसेच ऍड-इन लोड वा बंद केल्यावर कोड रन करण्यासाठी वापरु शकता.


तुम्ही कार्यक्रमितपणे एका ऍप्लीकेशनच्या ऑब्जेक्ट मॉडेलला ऍक्सेस करणारे कोड लिहून, एखाद्या ऑफिस ऍप्लीकेशनचा तुमच्या सोल्यूशन्समध्ये समावेश करु शकता. ऑब्जेक्ट मॉडेल्स या वर्गांच्या व्यवस्था असतात ज्या विविध वैशिष्टे व रीतींनी कार्यपध्दतींचे प्रदर्शन करतात. प्रत्येक ऑफिस ऍप्लीकेशनसाठी ऑब्जेक्ट मॉडेल हे वेगळे असते.


विज्युअल स्टुडियोत ऑफिस विकसन टूल्स वापरुन निर्मीत एका सोल्यूशनमधून ऑफिस ऍप्लीकेशनच्या ऑब्जेक्ट मॉडेलला वापरण्यासाठी, तुम्हाला ऍप्लीकेशनसाठी प्रायमरी इंटरॉप असेंब्ली (पीआयए) वापरणे अनिवार्य आहे. पीआयए तुमच्या सोल्यूशनमधील मॅनेज्ड कोडला ऑफिस ऍप्लीकेशनच्या कॉम (COM) आधारित ऑब्जेक्ट मॉडेलशी देवघेव करण्यास अभिनीत करते.


एखादे ऑफिस सोल्यूशन बनवण्यास व विकसित करण्यासाठी, ऑफिस पीआयए तुमच्या विकासक कंप्यूटरवर इन्स्टॉल असायलाच हवे. ऑफिस सोल्यूशन्स, जी डॉट एनईटी फ्रेमवर्क 3.5 ला टार्गेट करतात त्यांना रन करण्यासाठी पीआयए एन्ड युजर कंप्यूटर्सवरही इन्स्टॉल करणे गरजेचे आहे, परंतु, ऑफिस सोल्यूशन्स, जी डॉट एनईटी फ्रेमवर्क 4 ला टार्गेट करतात त्यांना रन करण्यासाठी पीआयए एन्ड युजर कंप्यूटर्सवरही इन्स्टॉल करण्याची गरज नाही.

 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.