Skip Ribbon Commands
Skip to main content

​​​​​​

इनपुट मेथड एडिटर्स इंस्टॉल करणे आणि वापरणे


हा लेख स्टँडर्ड विंडोज इनपुट मेथड एडिटर (IME) इंस्टॉल कसे करावे आणि कसे वापरावे याविषयी मार्गदर्शन करतो.

इनपुट मेथड एडिटर इंस्टॉल करणे

चार वेगवेगळ्या पूर्व आशियाई भाषांमध्ये जटिल अक्षरे लिहण्याकरिता इनपुट मेथड एडिटर्सना (IMEs) इंस्टॉल कसे करावे आणि कसे वापरावे याचे वर्णन खालील भाग करतो. प्रत्येक भाषेच्या विशिष्ट वैशिष्ट्यांची चर्चा यामध्ये केलेली आहे.

अॅप्लिकेशनमध्ये इनपुट मेथड एडिटर (IME) कार्यक्षमतेची अंमलबजावणी करण्याकरिता Using an Input Method Editor in a Game बघावे.

मायक्रोसॉफ्ट विंडोज एक्सपी प्रणालीवर IME आधीच इंस्टॉल केलेले नसते. ते इंस्टॉल करण्याकरिता, खालील टप्प्यांचे अनुसरण करावे.

IME इंस्टॉल करण्याकरिता

 1. कंट्रोल पॅनलमधून रिजनल अँड लॅग्वेज पर्याय निवडा.
 2. लँग्वेज टॅबवर इंस्टॉल फाईल्स फॉर ईस्ट एशियन लँग्वेजचा चेकबॉक्स सिलेक्ट करा.


एक इंस्टॉल सप्लीमेंटल लँग्वेज सपोर्ट डायलॉग बॉक्स प्रगट होतो जो आपल्याला लँग्वेज फाईल्सकरिता स्टोरेजची गरज असल्याचे कळवतो.
 1. डायलॉग बॉक्स बंद करण्याकरिता ओके वर क्लिक करा.
 2. लँग्वेज टॅबवरील ओके वर क्लिक करा.
 3. आणखी एक डायलॉग बॉक्स प्रगट होईल जो विंडोज एक्सपी इंस्टॉल डिस्क किंवा नेटवर्क शेअर लोकेशनची मागणी करेल जेथे भाषेच्या सहाय्यक फाईल्स स्टोर केलेल्या आहेत. विंडोज एक्सपी कॉम्पॅक्ट डिस्क टाका किंवा योग्य नेटवर्क लोकेशनवर ब्राउज करा आणि ओके वर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट विंडोज आवश्यक फाईल्स इंस्टॉल करेल आणि आपल्याला संगणक पुन्हा सुरू करण्यास सांगेल.
 4. संगणक पुन्हा सुरू करण्याकरिता यस वर क्लिक करा.
 5. पुन्हा सुरू केल्यानंतर, रिजनल अँड लँग्वेज ऑप्शन्स कंट्रोल पॅनल पुन्हा एकदा उघडा.
 6. लँग्वेजेस टॅबवरील डिटेल्सवर क्लिक करा. टेक्स्ट सर्व्हिसेस अँड इनपुट लँग्वेजेस विंडोज प्रगट होईल.

 1. सेटिंग्ज टॅबवरील अॅड वर क्लिक करा. अॅड इनपुट लँग्वेज विंडोज प्रगट होईल.

 1. इनपुट भाषेच्या स्वरूपात चीनी (तैवान) निवडा आणि कीबोर्ड लेआउट/ IME करिता मायक्रोसॉफ्ट न्यू फोनेटिक IME 2002 निवडा.
 2. ओके वर क्लिक करा. आता आपण एकाच तऱ्हेने अतिरिक्त भाषा आणि IMEs ना जोडू शकता.
 3. पुन्हा अॅड वर क्लिक करा, इनपुट भाषेकरिता चीनी (PRC) निवडा आणि कीबोर्ड लेआउट/ IME करिता चीनी (सरलीकृत) – मायक्रोसॉफ्ट पिनयीन IME 3.0 निवडा व मग ओके वर क्लिक करा.
 4. पुन्हा अॅड वर क्लिक करा, इनपुट भाषेकरिता जपानी निवडा आणि कीबोर्ड लेआउट/ IME करिता मायक्रोसॉफ्ट IME स्टँडर्ड 2002 आवृत्ती 8.1 निवडा व मग ओके वर क्लिक करा.
 5. पुन्हा अॅड वर क्लिक करा, इनपुट भाषेकरिता कोरियन निवडा आणि कीबोर्ड लेआउट/ IME करिता कोरियन इनपुट सिस्टम (IME 2002) निवडा व मग ओके वर क्लिक करा. टेक्स्ट सर्व्हिसेस आणि इनपुट लँग्वेज विंडो मधील इंस्टॉल्ड सर्व्हिसेस लिस्ट बॉक्स मध्ये आता चार नवीन जोडलेल्या IMEs समाविष्ट असायला हव्या.

 1. टेक्स्ट सर्व्हिसेस व इनपुट लँग्वेज विंडो बंद करण्याकरिता ओके वर क्लिक करा.
 2. रिजनल अँड लँग्वेज ऑप्शन्स कंट्रोल पॅनल बंद करण्याकरिता ओके वर क्लिक करा. विंडोज टास्कबारवर आता लाल वर्तुळामधील इनपुट लोकल इंडिकेटर दिसले पाहिजे. इंडिकेटरची उपस्थिती हे दर्शवते की प्रणालीवर एकापेक्षा जास्त इनपुट भाषा इंस्टॉल केलेल्या आहे.

सरलीकृत चीनी IME

काही चीनी अक्षरे लिहण्याकरिता मायक्रोसॉफ्ट नोटपॅडसोबत सरलीकृत चीनी IME (PinYin) चा वापर कसा करायचा याचे वर्णन हा भाग करतो.

 1. नोटपॅड सुरू करा (स्टार्ट बटणमध्ये उपलब्ध आहे, मग ऑल प्रोग्राम्स अँड ऍसेसरीज निवडा). नोटपॅडमध्ये काही अक्षरे लिहा. या अक्षरांची नंतर आपल्याला IME विंडोची उत्तमरित्या कल्पना करण्यास मदत होईल.

 1. नोटपॅड हे सक्रिय अॅप्लिकेशनच्या स्वरूपात असतांना इनपुट लोकल इंडिकेटरवर क्लिक करा आणि चीनी (PRC) निवडा. इंडिकेटर डिस्प्ले CH मध्ये बदलेल ज्यामुळे नवीन इनपुट भाषा ही चीनी (PRC) आहे हे माहित होईल.

 1. कर्सर नोटपॅडमध्ये ठेवा. कीबोर्डवर होम दाबा जेणेकरून कर्सर ओळीच्या सुरवातीला येईल. कीबोर्डवर "N" व मग "I" दाबा. खालील चित्र डिस्प्लेचे स्वरूप दर्शवत आहे. छोटा आडवा आयत हा रिडिंग विंडो आहे जो सध्याची रिडिंग स्ट्रींग दाखवतो. "N" आणि "I" टाईप केल्याने सध्या रिडिंग स्ट्रींग "ni" दाखवत आहे.

 1. "3" टाईप करा. आता नोटपॅडवर खालील डिस्प्ले दिसत आहे. कारण की N+I+3 हे सरलीकृत चीनी पिनयीन मध्ये संपूर्ण उच्चारण असल्याने वापरकर्त्याला कोणते अक्षर लिहायचे आहे याचा अंदाज बांधण्याकरिता IME ला पूरेशी माहिती मिळालेली आहे. आपण संपूर्ण उच्चारण लिहल्यामुळे रिडिंग विंडो अदृश्य झाली. नोटपॅड कर्सरच्या वर एक अक्षर दिसायला लागले. हे अक्षर नोटपॅडचा भाग नाही, खरे म्हणजे ते नोटपॅडच्या वर दुसऱ्या एका विंडोमध्ये दाखवलेले आहे आणि त्याखाली असलेल्या सध्याच्या अक्षराला त्याने झाकलेले आहे. या नवीन विंडोला कम्पोझिशन विंडो असे म्हटले जाते आणि त्यामधील स्ट्रींगला कम्पोझिशन स्ट्रींग असे म्हटले जाते. कम्पोझिशन स्ट्रींगला डिस्प्ले मध्ये अधोरेखित केलेले आहे.

 1. आता दुसरे अक्षर लिहण्याकरिता "H", "A", "O", "3" टाईप करा. लक्षात घ्या कि "H" टाईप केल्यानंतर रिडिंग विंडो दिसायला लागते आणि 3 टाईप केल्यानंतर नाहिशी होते. खाली दाखवल्याप्रमाणे आता कम्पोझिशन स्ट्रींगमध्ये दोन अक्षरे आहेत.

 1. कीबोर्डवरील डावा बाण एकवेळा दाबा. कम्पोझिशन कर्सर आपण टाईप केलेल्या दुसऱ्या अक्षराकडे एक अक्षर डावीकडे सरकेल. नोटपॅडवर खाली दाखवल्याप्रमाणे एक विंडो दिसायला लागेल. या विंडोला कँडिडेट विंडो असे म्हणतात. ही विंडो आपण टाईप केलेल्या उच्चारणाशी मिळतेजुळते अक्षरे किंवा वाक्य दाखवते. आपण कँडिडेट सूचीमधील एंट्रींमधून आपला अपेक्षित शब्द निवडू शकता. या उदाहरणामध्ये, एकाच उच्चारणाचे दोन कँडिडेट अक्षरे उपलब्ध आहेत.

 1. दुसरी एंट्री निवडण्याकरिता 2 टाईप करा. आता कँडिडेट विंडो बंद होईल आणि कम्पोझिशन स्ट्रींग निवडलेल्या अक्षराने अपडेट होईल.

 1. एंटर दाबा. यामुळे IME ला सांगण्यात येईल की कम्पोझिशन पूर्ण झालेले आहे आणि या उदाहरणामधील अॅप्लिकेशन नोटपॅडला स्ट्रींग पाठवायची आहे. कम्पोझिशन विंडो बंद होईल आणि WM_CHAR द्वारे दोन्ही अक्षरांना नोटपॅडमध्ये पाठवलेले असेल. खालील आकृतीमधील अंडरलाईन आता अदृश्य झालेली असेल कारण की दोन्ही अक्षरे आता नोटपॅडमधील मजकूराचा भाग झालेले असतील. नोटपॅडमधील विद्यमान मजकूर "ABCDEFG" उजवीकडे सरकलेला असेल कारण की त्याआधी दोन नवीन अक्षरे आलेली असतील. आपण IME चा वापर करून आता यशस्वीरित्या दोन सरलीकृत चीनी अक्षरांना लिहलेले आहे.

पारंपारिक चीनी IME

काही चीनी अक्षरे लिहण्याकरिता नोटपॅडसोबत पारंपारिक चीनी IME (नवीन फोनेटीक) चा वापर कसा करावा याचे वर्णन हा भाग करतो.

 1. नोटपॅड सुरू करा. नोटपॅडमध्ये काही अक्षरे लिहा. या अक्षरांची नंतर आपल्याला IME विंडोची उत्तमरित्या कल्पना करण्यास मदत होईल.

 1. विंडोज टास्कबारवरील इनपुट लोकल इंडिकेटरवर क्लिक करा आणि चीनी (तैवान) निवडा. इंडिकेटर डिस्प्ले CH मध्ये बदलेल ज्यामुळे नवीन इनपुट भाषा ही चीनी (तैवान) आहे हे माहित होईल.

 1. कर्सर नोटपॅडमध्ये ठेवा. कीबोर्डवर होम दाबा जेणेकरून कर्सर ओळीच्या सुरवातीला येईल. कीबोर्डवर "S" व मग "U" दाबा. खालील चित्र डिस्प्लेचे स्वरूप दर्शवत आहे. छोटा आडवा आयत हा रिडिंग विंडो आहे जो सध्याची रिडिंग स्ट्रींग दाखवतो. खालच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे, "S" व "U" टाईप केल्याने रिडिंग स्ट्रींग मध्ये दोन अक्षरे आहेत.

 1. "3" टाईप करा. आता नोटपॅडवर खालील डिस्प्ले दिसत आहे. कारण की S+U+3 हे सरलीकृत चीनी मधील संपूर्ण उच्चारण असल्याने वापरकर्त्याला कोणते अक्षर लिहायचे आहे याचा अंदाज बांधण्याकरिता IME ला पूरेशी माहिती मिळालेली आहे. आपण संपूर्ण उच्चारण लिहल्यामुळे रिडिंग विंडो अदृश्य झाली. नोटपॅड कर्सरच्या वर एक अक्षर दिसायला लागले. हे अक्षर नोटपॅडचा भाग नाही, खरे म्हणजे ते नोटपॅडच्या वर दुसऱ्या एका विंडोमध्ये दाखवलेले आहे आणि त्याखाली असलेल्या सध्याच्या अक्षराला त्याने झाकलेले आहे. या नवीन विंडोला कम्पोझिशन विंडो असे म्हटले जाते आणि त्यामधील स्ट्रींगला कम्पोझिशन स्ट्रींग असे म्हटले जाते. कम्पोझिशन स्ट्रींगला डिस्प्ले मध्ये अधोरेखित केलेले आहे.

 1. आता दुसरे अक्षर लिहण्याकरिता "C", "L", आणि "3" टाईप करा. लक्षात घ्या कि "C" टाईप केल्यानंतर रिडिंग विंडो दिसायला लागते आणि 3 टाईप केल्यानंतर नाहिशी होते. खाली दाखवल्याप्रमाणे आता कम्पोझिशन स्ट्रींगमध्ये दोन अक्षरे आहेत.

 1. कीबोर्डवरील खालचा बाण एकवेळा दाबा. नोटपॅडवर खाली दाखवल्याप्रमाणे एक विंडो दिसायला लागेल. या विंडोला कँडिडेट विंडो असे म्हणतात. ही विंडो आपण टाईप केलेल्या उच्चारणाशी मिळतेजुळते अक्षरे किंवा वाक्य दाखवते. आपण कँडिडेट सूचीमधील एंट्रींमधून आपला अपेक्षित शब्द निवडू शकता. या उदाहरणामध्ये, एकाच उच्चारणाचे तीन कँडिडेट अक्षरे उपलब्ध आहेत.

 1. दुसरी एंट्री निवडण्याकरिता 2 टाईप करा. आता कँडिडेट विंडो बंद होईल आणि कम्पोझिशन स्ट्रींग निवडलेल्या अक्षराने अपडेट होईल.

 1. एंटर दाबा. यामुळे IME ला सांगण्यात येईल की कम्पोझिशन पूर्ण झालेले आहे आणि या उदाहरणामधील अॅप्लिकेशन नोटपॅडला स्ट्रींग पाठवायची आहे. कम्पोझिशन विंडो बंद होईल आणि WM_CHAR द्वारे दोन्ही अक्षरांना नोटपॅडमध्ये पाठवलेले असेल. खालील आकृतीमधील अंडरलाईन आता अदृश्य झालेली असेल कारण की दोन्ही अक्षरे आता नोटपॅडमधील मजकूराचा भाग झालेले असतील. नोटपॅडमधील विद्यमान मजकूर "ABCDEFG" उजवीकडे सरकलेला असेल कारण की त्याआधी दोन नवीन अक्षरे आलेली असतील. आपण IME चा वापर करून आता यशस्वीरित्या दोन पारंपारिक चीनी अक्षरांना लिहलेले आहे.

जपानी IME

काही जपानी अक्षरे लिहण्याकरिता नोटपॅडसोबत जपानी IME चा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन हा भाग करतो.

 1. नोटपॅड सुरू करा. नोटपॅडमध्ये काही अक्षरे लिहा. या अक्षरांची नंतर आपल्याला IME विंडोची उत्तमरित्या कल्पना करण्यास मदत होईल.

 1. नोटपॅड हे सक्रिय अॅप्लिकेशनच्या स्वरूपात असतांना इनपुट लोकल इंडिकेटरवर क्लिक करा आणि जपानी भाषा निवडा. इंडिकेटर डिस्प्ले JP मध्ये बदलेल ज्यामुळे नवीन इनपुट भाषा ही जपानी आहे हे माहित होईल.

 1. कर्सर नोटपॅडमध्ये ठेवा. कीबोर्डवर होम दाबा जेणेकरून कर्सर ओळीच्या सुरवातीला येईल. कीबोर्डवर "N" व मग "I" दाबा. खालील चित्र डिस्प्लेचे स्वरूप दर्शवत आहे. कारण की N+I हे जपानी मध्ये संपूर्ण उच्चारण असल्याने वापरकर्त्याला कोणते अक्षर लिहायचे आहे याचा अंदाज बांधण्याकरिता IME ला पूरेशी माहिती मिळालेली आहे. नोटपॅड कर्सरच्या वर एक अक्षर दिसायला लागले. हे अक्षर नोटपॅडचा भाग नाही, खरे म्हणजे ते नोटपॅडच्या वर दुसऱ्या एका विंडोमध्ये दाखवलेले आहे आणि त्याखाली असलेल्या सध्याच्या अक्षराला त्याने झाकलेले आहे. या नवीन विंडोला कम्पोझिशन विंडो असे म्हटले जाते आणि त्यामधील स्ट्रींगला कम्पोझिशन स्ट्रींग असे म्हटले जाते. कम्पोझिशन स्ट्रींगला डिस्प्ले मध्ये अधोरेखित केलेले आहे.

 1. आता अधिक दोन अक्षरे लिहण्याकरिता "H", "O", "N", "G" आणि "O" टाईप करा. खाली दाखवल्याप्रमाणे आता कम्पोझिशन स्ट्रींगमध्ये चार अक्षरे आहेत.

 1. स्पेस बार दाबा. यामुळे लिहलेल्या मजकूराला वाक्यामध्ये बदलण्याची सूचना IME ला मिळेल. खालच्या आकृतीमध्ये IME ने "Nihongo" या उच्चारणाला कांजी मध्ये लिहलेल्या वाक्यामध्ये बदलले आहे ज्याचा अर्थ आहे "जपानी भाषा".

 1. कीबोर्डवरील खालचा बाण एकवेळा दाबा. नोटपॅडवर खाली दाखवल्याप्रमाणे एक विंडो दिसायला लागेल. या विंडोला कँडिडेट विंडो असे म्हणतात. ही विंडो आपण टाईप केलेल्या उच्चारणाशी मिळतेजुळते वाक्य दाखवते. आपण कँडिडेट यादीमधून आपला अपेक्षित शब्द निवडू शकता. या उदाहरणामध्ये, एकाच उच्चारणाचे तीन कँडिडेट अक्षरे उपलब्ध आहेत. लक्षात घ्या की दुसरी एंट्री अधोरेखित केलेली आहे आणि कम्पोझिशन स्ट्रींग बदललेली आहे. हे खालचा बाण टाईप केल्याने होते, यामुळे IME ला आधी दाखवलेल्या एंट्रीनंतरची एंट्री निवडण्यास सांगण्यात येते.

 1. दुसरी एंट्री निवडण्याकरिता 2 टाईप करा. आता कँडिडेट विंडो बंद होईल आणि कम्पोझिशन स्ट्रींग निवडलेल्या अक्षराने अपडेट होईल.

 1. एंटर दाबा. यामुळे IME ला सांगण्यात येईल की कम्पोझिशन पूर्ण झालेले आहे आणि या उदाहरणामधील अॅप्लिकेशन नोटपॅडला स्ट्रींग पाठवायची आहे. कम्पोझिशन विंडो बंद होईल आणि WM_CHAR द्वारे दोन्ही अक्षरांना नोटपॅडमध्ये पाठवलेले असेल. खालील आकृतीमधील अंडरलाईन आता अदृश्य झालेली असेल कारण की दोन्ही अक्षरे आता नोटपॅडमधील मजकूराचा भाग झालेले असतील. नोटपॅडमधील विद्यमान मजकूर "ABCDEFG" उजवीकडे सरकलेला असेल कारण की त्याआधी दोन नवीन अक्षरे आलेली असतील. आपण IME चा वापर करून आता यशस्वीरित्या काही जपानी अक्षरांना लिहलेले आहे.

 1. कोरियन IME

  काही कोरियन अक्षरे लिहण्याकरिता नोटपॅडसोबत कोरियन IME चा वापर कसा करावा याचे वर्णन हा भाग करतो.

  1. नोटपॅड सुरू करा. नोटपॅडमध्ये काही अक्षरे लिहा. या अक्षरांची नंतर आपल्याला IME विंडोची उत्तमरित्या कल्पना करण्यास मदत होईल.
  Characters that help to visualize the IME window better later
  1. नोटपॅड हे सक्रिय अॅप्लिकेशनच्या स्वरूपात असतांना इनपुट लोकल इंडिकेटरवर क्लिक करा आणि कोरियन निवडा. इंडिकेटर डिस्प्ले KO मध्ये बदलेल ज्यामुळे नवीन इनपुट भाषा ही कोरियन आहे हे माहित होईल.

 1. कर्सर नोटपॅडमध्ये ठेवा. कीबोर्डवर होम दाबा जेणेकरून कर्सर ओळीच्या सुरवातीला येईल व मग "G" दाबा. खालील चित्र डिस्प्लेचे स्वरूप दर्शवत आहे. "G" शी संबंधित फोनेटिक घटक नोटपॅडवर दिसून येईल आणि ब्लॉक कर्सरद्वारे ठळकपणे दिसेल. या ठळक अक्षराला कम्पोझिशन स्ट्रींग म्हणतात. लक्षात घ्या की इतर भाषांच्या IME च्या विपरीत, कम्पोझिशन स्ट्रींग नोटपॅडला पाठवली जाते आणि वापरकर्त्याने एकल फोनेटिक घटक प्रविष्ट केल्याबरोबर तीला विद्यमान मजकूराच्या डावीकडे टाकले जाते.

 1. यावेळी कम्पोझिशन स्ट्रींगमध्ये एक अंतरिम अक्षर समाविष्ट आहे कारण की वापरकर्त्याने प्रविष्ट केलेला कोणताही अतिरिक्त फोनेटिक घटक कम्पोझिशन स्ट्रींगला व्यवस्थित करतो. आता "K" व मग "S" टाईप करा. लक्षात घ्या की अंतरिम अक्षर प्रत्येक कीस्ट्रोकसोबत बदलते.

 1. आता उजवी CTRL की दाबा. एक कँडिडेट विंडो दिसायला लागेल ज्यामध्ये आपण लिहलेल्या G+K+S या उच्चारणाकरिता निवड करण्यासाठी हंजा अक्षरांची यादी दिलेली असेल.

 1. यादीमधील पहिली एंट्री निवडण्याकरिता 1 अंक टाईप करा. कँडिडेट विंडो बंद होईल आणि कम्पोझिशन स्ट्रींग निवडलेल्या अक्षराने अपडेट होईल.

 1. "R", "N" आणि "R" टाईप करा. मग दुसरे अक्षर लिहण्याकरिता उजवी CTRL की टाईप करा.

 1. पहिली एंट्री निवडण्याकरिता 1 टाईप करा. आपण आता IME चा वापर करून दोन कोरियन अक्षरे यशस्वीरित्या लिहलेली आहेत. कोरियन अक्षरे नोडपॅडमधील टेक्स्ट स्ट्रींगचा आधीच भाग आहेत.

आवश्यकता

संचालन प्रणाली विंडोज XP
हार्ड डिस्क मधील उपलब्ध जागाकमीत कमी 230 MB

विदेशी भाषा फाईलचे

ठिकाण

विंडोज XP इंस्टॉलेशन कॉम्पॅक्ट डिस्क किंवा विंडोज XP इंस्टॉलेशन फाईल्सचे नेटवर्कवरचे ठिकाण
वेळ विदेशी भाषा फाईल्स इंस्टॉल करण्याकरिता जवळपास दहा मिनिट, चार वेगवेगळ्या IMEs ची समीक्षा करण्याकरिता प्रत्येकी दहा मिनिटे.

​ 


​​​
​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

    Read More on....

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.