Skip Ribbon Commands
Skip to main content

भारतीय चलनासाठी रुपयाचे चिन्ह

 

 

 

                  विंडोज समुहाने एक अपडेट प्रकाशित केला आहे जो विंडोज विस्टा, विंडोज सर्वर 2008, विंडोज 7 व विंडोज सर्वर 2008 आर2 साठी नवीन रुपया चलन चिन्हास आणखी आधार प्रदान करते. हा अपडेट वापरकर्त्यांस निविष्टीसाठी, अवलोकन करण्यासाठी, छपाईसाठी व नव्या चिन्हास भारतीय चलन म्हणून फॉरमॅटेड डेटा डीफॉल्ट चिन्ह म्हणून वापरण्याची सुगमता देते, जसे की एक्सेस फील्ड्समध्ये, एक्सेल सेल्समध्ये, किंवा शेअरपॉईंट यादींतील करेंसी कॉलमात.

 

चिन्हे दोन प्रकारे घातली जाऊ शकतात जसे की एमएस ऑफिसच्या कुठल्याही उत्पादनांत इनसर्ट सिंबल कमांड वापरुन किंवा विंडोज “कॅरॅक्टर मॅप” युटीलिटी वापरुन.


विंडोज अपडेट तीन मुख्य क्षेत्रांना पोहोचतो जी आहेत
फाँट फॅमिलीजचे अपडेटः मायक्रोसॉफ्ट सॅन्स सेरिफ, टाईम्स न्यू रोमन, एरियल, सेगो, व तहोमा. हे वापरले जाते जेव्हा कुठल्याही एमएस ऑफिस ऍप्लिकेशनमध्ये दस्तावेज बनवले जाते. जर तुम्ही असा फाँट वापरत आहात ज्यात नवीन चिन्हाचा समावेश नाही, तर त्या एका कॅरॅक्टरसाठी फाँट बदला.

 

रुपयाचे चिन्ह निविष्ट करण्यासाठी 13 इंडिक लोकल कीबोर्ड्स चा अपडेट Ctrl+Shift+4 वापरुन करावा. नवीन इंग्रजी (भारतीय) कीबोर्डवर, AltGr+4 कळ संयोगाने नवीन चिन्ह निविष्ट करेल.

 

स्थानीय माहिती अपडेट केल्याने नवीन चिन्ह, करेंसी म्हणून अपडेट केल्या जाणाऱ्या आयटम्ससाठी आपोआप वापरले जाते, जसे की एक्सेस फील्ड्स, एक्सेल सेल्स, किंवा किंवा शेअरपॉईंट यादींतील करेंसी कॉलम.

 

काही मायक्रोसॉफ्टचे प्रोग्राम्स, जसे की पावरपॉईंट व इंफोपाथ, युनिकोड कोड्सना कॅरॅक्टर्समध्ये परिवर्तित करु शकत नाही. जर तुम्हाला गरज असेल एका युनिकोड कॅरॅक्टरची व वापरत असाल युनिकोड कोड्सना कॅरॅक्टर्समध्ये परिवर्तित करण्यास आधार न देणारा प्रोग्राम, तर तुमच्या गरजेच्या कॅरॅक्टरना निविष्ट करण्यासाठी कॅरॅक्टर मॅप वापरा.

 

जर तुमच्या प्रिंटरमध्ये रुपया चलनाचे चिन्ह त्याच्या कुठल्याही रेसिडेंट फाँट्समध्ये नसल्यास, प्रिंटर सेटअप प्रॉपर्टीजमध्ये प्रिंट फाँट्स ऍज ग्राफीक्स हा पर्याय शोधा किंवा तुमच्या प्रिंटर विक्रेत्याशी रुपया चलन चिन्हाचा समावेश असलेल्या अपडेटेड प्रिंटर फाँट्सना कसे मिळवावे यासाठी संपर्क करा.

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.