Skip Ribbon Commands
Skip to main content

 

एमएस एक्सेल 2007

 

नवीन परिणाम-आधारित उपयोगकर्ता इंटरफेस मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल मधे काम करणे तुमच्यासाठी अतिशय सोपे करून टाकतो. जी कमांड्स आणि वैशिष्ट्ये आधी जटिल मेन्यु आणि टूलबार्समधे लपून असायची, ती आता कमांड्स आणि वैशिष्ट्यांचे अर्थपूर्ण समूह असलेल्या कार्य आधारित टॅब्स वर सहज सापडतात. बऱ्याच डायलॉग बॉक्सेसच्या ऐवजी आता ड्रॉप-डाउन गॅलरीज आहेत ज्यात उपलब्ध पर्याय प्रदर्शित असतात, आणि तुम्हाला योग्य पर्याय निवडण्यास मदत म्हणून वर्णनात्मक टूलटिप्स किंवा उदाहरणात्मक नमुने दिलेले असतात.

 

विषयवस्तु

ऑफिस एक्सेल 2007 मधे, एखादी विषयवस्तु लागू करून किंवा एक विशिष्ट शैली वापरून तुम्ही तुमच्या वर्कशीट मधील माहिती लगेच फॉर्मेट करू शकता. विषयवस्तुंचा ऑफिस 2007 च्या इतर प्रोग्रॅम्स, जसे मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॉवरपॉईंट, मधे आपसात सह-वापर केला जाऊ शकतो, तर शैली या केवळ एक्सेल आधारित वस्तुंचे, जसे एक्सेल टेबल, चार्ट्स, पिव्हट टेबल, आकार आणि चित्रांचे फॉर्मेट बदलण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत.

 

पंक्ति आणि स्तंभ

ऑफिस एक्सेल 2007 मधे, एका वर्कशीटमधे 1 दशलक्ष पर्यंत पंक्ति आणि 16 हजार पर्यंत  स्तंभ समावू शकतात. निश्चितपणे, ऑफिस एक्सेल 2007 चौकटीमधे 1,048,576 पंक्ति आणि 16,384 स्तंभ असतात, म्हणजेच यात तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल 2003च्या तुलनेत 1,500% अधिक पंक्ति आणि 6,300% अधिक स्तंभ मिळतात.

 

फॉर्मेटिंग आणि फिल्टरिंग

ऑफिस 2007 मधे, तुम्ही तुमच्या माहितीच्या विश्लेषण आणि सादरीकरण, दोन्ही उद्देश्यांसाठी दृश्य टीपा देण्यासाठी सशर्त फॉर्मेटिंग वापरू शकता. अपवाद सहज शोधण्यासाठी आणि तुमच्या माहितीतील महत्वाचे कल ओळखण्यासाठी तुम्ही अनेक सशर्त फॉर्मेटिंग नियम लागू करू शकता, जे त्या नियमाप्रमाणे असलेल्या माहितीवर उतरते रंग, डेटा बार आणि चिन्हांच्या मदतीने उच्च दृश्यमान फॉर्मेटिंग लागू करतात.

ऑफिस 2007 मधे, तुम्ही तुमच्या वर्कशीट मधील माहिती पटकन व्यवस्थित करून सुधारित फिल्टरिंग आणि सॉर्टिंगच्या मदतीने सहज उत्तरे मिळवू शकता.

 

चार्टिंग

ऑफिस 2007 मधे, तुम्ही नवीन चार्टिंग टूल्स वापरून प्रभावीपणे माहिती देणारे प्रोफेशनल दिसणारे चार्ट्स तयार करू शकता. तुमच्या वर्कबुक वर लागू असलेल्या विषयवस्तुच्या आधारे चार्ट्सच्या नवीन, अद्यतन रूपात 3-डी, पारदर्शिता आणि सौम्य छटा यांसारख्या विशेष प्रभावांचा समावेश आहे.

तुम्हाला तुमच्या माहितीसाठी योग्य चार्ट तयार करता येण्यासाठी उपलब्ध चार्ट्सचे प्रकार शोधणे नवीन उपयोगकर्ता इंटरफेसच्या मदतीने अतिशय सोपे होते. तुम्हाला एक सुंदर फॉर्मेट निवडून त्यात हवी ती सर्व माहिती सामील करता येण्यासाठी चार्ट्सच्या भरपूर नवीन पूर्वनिर्धारित शैली आणि मांडणी पुरवल्या गेल्या आहेत.

ऑफिस 2007 मधे, एक्सेल, वर्ड आणि पॉवरपॉईंटमधे आपसात चार्टिंगचा सह-वापर केला जाऊ शकतो. मायक्रोसॉफ्ट ग्राफची चार्टिंग वैशिष्ट्ये वापरण्याऐवजी वर्ड आणि पॉवरपॉईंट आता एक्सेलच्या शक्तिशाली चार्टिंग वैशिष्ट्यांने युक्त आहेत. तुमच्या दस्तऐवजांचा आकार कमी करण्यासाठी तुमच्या चार्ट मधील माहिती असलेली एक्सेल वर्कशीट आता तुम्ही वर्ड किंवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमधे किंवा वेगळ्या फाइलमधे देखील सुरक्षित करू शकता.

पिव्हट टेबल वापरणे एक्सेलच्या आधीच्या आवृत्तिंच्या तुलनेत आता बरेच सोपे आहे. नवीन पिव्हट टेबल उपयोगकर्ता इंटरफेस वापरून तुमच्या आकडेवारीसंबंधी कुठलीही माहिती पाहणे आता केवळ काही क्लिक एवढे सोपे झाले आहे.

 

क्विक लाँच

ऑफिस एक्सेल 2007 मधे, आता तुम्हाला कॉर्पोरेट डेटा सोर्सच्या सर्व्हरचे किंवा डेटाबेसचे नाव लक्षात ठेवण्याची गरज माही. त्याऐवजी,  तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटर किंवा वर्कग्रुप विशेषज्ञाने पुरवलेल्या डेटा सोर्स यादीतून निवडण्यासाठी तुम्ही क्विकलाँच वापरू शकता. एक्सेल मधील एक कनेक्शन प्रबंधक तुम्हाला एका वर्कबुकमधे असलेले सर्व कनेक्शन पाहू देतो आणि एखाद्या कनेक्शनचा पुनर्वापर करणे किंवा त्याला दुसऱ्या कनेक्शनने विस्थापित करणे सोपे करतो.

नॉर्मल व्ह्यू आणि पेज ब्रेक प्रिव्ह्यू व्ह्यूच्या व्यतिरिक्त ऑफिस एक्सेल 2007 एक पेज लेआउट व्ह्यू देखील उपलब्ध करून देतो. याच्या द्वारे तुम्ही तुमची वर्कशीट छापील स्वरूपात कशी दिसेल याचा अंदाज घेत-घेत तिला तयार करू शकता. या व्ह्यूमधे तुम्ही पेज हेडर, फूटर आणि मार्जिन सेटिंग्सवर थेट वर्कशीटमधे काम करू शकता आणि चार्ट्स किंवा आकार सारख्या वस्तु तुम्हाला हव्या तिथे अचूकपणे ठेवू शकता. नवीन उपयोगकर्ता इंटरफेसमधे तुम्हाला पेज सेटअपचे पर्याय देखील पेज लेआउट टॅब वर सहज उपलब्ध आहेत जे वापरून तुम्ही पेज ओरिएंटेशन सारखे पर्याय तात्काळ देऊ शकता. प्रत्येक पानावर काय छापले जाणार आहे ते सहज दिसू शकते, ज्याने वारंवार छापण्याचे प्रयास आणि पानावर अर्धवट माहिती छापली जाणे टाळले जाऊ शकेल.

 

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.