Skip Ribbon Commands
Skip to main content

​​​​​

​​

आयटी निष्णात व्यक्तींसाठी ऍझूर नेटवर्किंगची मूलभूत माहिती


ऍझूर नेटवर्क मूलतत्त्वे यांचा परिचय आणि व्हीपीएन आवश्यकता

या व्हिडिओ मध्ये, ऍरोन फार्नेल, तांत्रिक अभियंता, प्रोव्होक सॉल्यूशन्स, यांनी श्रृंखलेच्या अजेंड्याविषयी माहिती सांगण्यास आरंभ केला. पहिल्या मॉड्यूलमध्ये, त्यांनी व्हिपीएन मूलतत्त्वे आणि मिश्र वातावरणातील कार्यांमध्ये ऍझूर नेटवर्क कसे कार्य करते हे समजावून सांगितले. व्हिपीएन किंवा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क एक टनेलिंग तंत्रज्ञान आहे, जे बिंदुमध्ये बोगदा निर्माण करते. हा बोगदा इन्क्रिप्टेड केला जातो ज्यामुळे दोन बिंदुमधील संपर्क वाचू किंवा मध्येच हस्तगत केला जाऊ शकत नाही. आज वापरले जाणारे अधिकांश व्हिपीएन आयपीसेक की ने एनक्रिप्ट केलेले असतात. यामुळे सुनिश्चित केले जाईल की ज्याप्रकारे वायरलेस नेटवर्कचे कार्य चालते त्याचप्रकारे माहितीला डीक्रिप्ट करण्याकरीता एका पासवर्डची गरज असेल.

आपल्या क्लाऊड नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरची योजना आणि आराखडा बनवा.

दुस-या मॉड्यूलमध्ये, प्रशिक्षकांनी क्लाऊड नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरची योजना आणि आराखडा कसा बनवायचा हे समजावले. पुढील मॉड्यूलमध्ये एक प्रात्यक्षिक बनवण्याकरीता ते या तपशीलांचा वापर करणार आहे. नेटवर्किंगकरीता आवश्यक असणा-या पत्त्याच्या जागेची योजना बनवण्यापासून त्यांनी सुरूवात केली. ऍझूर पत्त्याच्या जागेसाठी, पत्ते एकमेव असले पाहिजे आणि ते ऑन-प्रिमाइस पत्त्यांसोबत ओव्हरलॅप झाले नाही पाहिजे. इथे आपण फक्त खाजगी पत्ते वापरू शकतो. पुढील स्लाईडमध्ये, त्यांनी व्हर्चुअल नेटवर्क, डीएनएस सर्व्हर, सबनेट इ. बाबींना कॉन्फिगर कसे करायचे हे समजावून सांगितले. त्यांनी नंतर ऍझूर नेटवर्कचा आढावा घेतला आणि दोन ठिकाणांमध्ये प्रात्यक्षिक वातावरणाचा आराखडा बनवला.

ऍझूर आणि ऑन-प्रिमायसेसला कॉन्फिगर करणे

या श्रृंखलेचे 3 रे मॉड्यूल ऍझूरमध्ये नेटवर्क बनवण्यापासून सुरू झाले. यामध्ये आभासी (व्हर्चुअल) नेटवर्क आणि पत्त्यांच्या जागा बनवणे, स्थानिक नेटवर्क आणि डायनॅमिक रूटिंग नेटवर्क स्थापित करणे सामिल आहे. शिकणे सोपे बनवण्याकरीता, प्रशिक्षकांनी मायक्रोसॉफ्ट ऍझूर इंटरफेस मध्ये नमुना नेटवर्क तयार करून या सगळ्यांचे प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये सेवा प्रदात्यासोबत व्हिपीएन, डीएनएस सर्व्हर तयार करणे आणि आभासी नेटवर्क पत्त्याच्या जागा असाईन करण्याचा समावेश आहे. मग त्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांकरीता आयपी पत्त्यांद्वारे स्थानिक नेटवर्क पत्ते जोडले आणि मग नेटवर्क गेटवे तयार केले. यानंतर त्यांनी दोन ठिकाणांमधील सुरक्षित कनेक्शनकरीता व्हिपीएन कॉन्फिगर कसे करायचे ते दाखवले.

कनेक्टिव्हिटी आणि देखरेखीची चाचणी

या श्रृंखलेच्या शेवटच्या भागामध्ये, प्रशिक्षकाने ऍझूर मध्ये आभासी यंत्र निर्माण करणे, त्याला आभासी नेटवर्क मध्ये जोडणे, कनेक्टिव्हिटीची चाचणी घेणे आणि जेव्हा सेटअप मध्ये समस्या उद्भवते तेव्हा त्यावर उपाययोजना करणे इ. विषयांशी संबंधित मार्गदर्शन केले. मागच्या व्हिडिओ प्रमाणेच, एका प्रात्यक्षिकाच्या मदतीने त्यांनी समजावून सांगितले. त्यांनी एक व्हीएम सेट करण्यापासून सुरूवात केली आणि आधी बनवलेल्या व्हिपीएनशी त्याला जोडले. मग त्यांनी यशस्वीरीत्या दोन्ही बाजूंनी पिंग चाचणीचा वापर केला आणि कनेक्टिव्हिटीला तपासण्याकरीता नेटवर्कद्वारे दूरस्थ डेस्कटॉपला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रशिक्षकांनी ऍझूरमध्ये व्हिपीएनशी संबंधित समस्यांचे निदान आणि उपाययोजनांच्या वेगवेगळ्या पद्धतींचे वर्णन केले.

This site uses Unicode and Open Type fonts for Indic Languages. Powered by Microsoft SharePoint
©2017 Microsoft Corporation. All rights reserved.